घरताज्या घडामोडीCorona Vaccination: गोव्यात १ मेपासून कोरोनाची लस मिळणार मोफत

Corona Vaccination: गोव्यात १ मेपासून कोरोनाची लस मिळणार मोफत

Subscribe

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढत झाली असून ३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता कोरोना लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. १ मार्चपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याची परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. केंद्राच्या या मोठ्या निर्णयानंतर अनेक राज्य १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी मोफत लसीकरणाची मोहिम राबवत आहे. आजच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात १८ वर्षांवरील व्यक्तींना ५ मेनंतरपासून मोफत लस देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता गोव्याने देखील असाच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

गोव्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील व्यक्तींना मोफत लस गोव्यात देखील दिली जाणार आहे. याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, ‘आज आम्ही कोविशिल्डचे ५ लाख डोसची ऑर्डर दिली आहे. आमची आर्थिक घडी चालूच ठेवली पाहिजे. त्यामुळे आमची लॉकडाउन लादण्याची इच्छा नाही.’

- Advertisement -

दरम्यान गोव्यात गेल्या २४ तासांत १ हजार ४१० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच ४६१ जण रुग्ण बरे होऊन घरी गेले. आता गोव्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७२ हजार २२४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९६४ जणांचा मृत्यू झाला असून ६१ हजार ३२ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्याा १० हजार २२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccination: देशात कोणकोणत्या राज्यात मोफत लस? जाणून घ्या एका क्लिकवर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -