घरमहाराष्ट्रमदत व पुनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचाही समावेश

मदत व पुनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचाही समावेश

Subscribe

'आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग' असे या विभागाला आता संबोधले जाणार आहे.

राज्यातील मदत व पुनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापन हे शब्द समाविष्ट करून या विभागाचे नाव ‘आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग’ असे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २ (स) नुसार आपत्ती व्यवस्थापनावर नियंत्रण असलेला विभाग राज्य शासनात कार्यरत असून कलम १४ नुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणही स्थापन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. आपत्ती व्यवस्थापन हा विषय मदत व पुनर्वसन विभागामार्फत हाताळण्यात येतो. अतिरिक्त सचिवांच्या अखत्यारित असलेल्या या विभागात मदत व पुनर्वसनसाठी स्वतंत्र उपसचिव आहेत तर आपत्ती व्यवस्थापनासाठी आपत्ती व्यवस्थान संचालक हे पद पदसिद्ध उपसचिवाचे आहे. त्यामुळे मदत व पुनर्वसन विभागातर्फेच आपत्ती व्यवस्थापन करण्यात येत असल्याने या विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश करण्यास आज मान्यता देण्यात आली.


हेही वाचा – आता ‘महा मदत’ अँपद्वारे होणार दुष्काळाचे विश्लेषण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -