घरमहाराष्ट्रविद्यापीठांनी आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे आवाहन

विद्यापीठांनी आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे आवाहन

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मांडून भारताला सशक्त करण्यासाठी मोठे अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल म्हणून या अभियानाला चालना देण्यासाठी विद्यापीठाने आत्मनिर्भर विद्यापीठ होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी केले.

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे झाली. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.

- Advertisement -

महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या नेहमी अग्रेसर राज्य राहिले आहे. हा आलेख नेहमीच आपण चढता ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहात. नवीन शैक्षणिक धोरणात संस्कृती आणि भारतीय ज्ञानप्रणाली आधारित नवीन संकल्पना आणि नाविन्यता यावर विशेष लक्ष केंद्रित करून शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना सुरुवातीला अडचणी येऊ शकतात, परंतु यातून सकारात्मक मार्ग दाखवत विद्यार्थी हितासाठी सर्वांनी कार्य करावे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

कौशल्य अभ्यासक्रम तयार करावेत – मंगलप्रभात लोढा
संबंधित विभागातील रोजगारनिर्मितीसाठी संशोधन करून विद्यापीठाने कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार करावे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. जपानसारख्या देशांनी स्वतःची नॉलेज बँक तयार केली आणि कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. त्याच धर्तीवर विद्यापीठाने कौशल्य आधारित अभ्यासक्रम, सेवा, रोजगार निर्मिती यावर विशेष लक्ष देऊन रोजगार निर्मितीसाठी सहकार्य करावे. यासाठी शासन वित्तीय सहकार्य करेल, असे आश्वासनही मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

- Advertisement -

या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत सादरीकरण केले. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनीही लोकशाहीतील सहभाग यावर सादरीकरण केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -