Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Maharashtra Political Crisis : राज्यपालांची भूमिका घृणास्पद, उद्धव ठाकरेंची जहरी टीका

Maharashtra Political Crisis : राज्यपालांची भूमिका घृणास्पद, उद्धव ठाकरेंची जहरी टीका

Subscribe

राज्यपालांची भूमिका ही घृणास्पद आहे. म्हणून जोपर्यंत या राज्यपाल नियुक्तीवर काही नियमावली येत नाही तोपर्यंत सरळ हे राज्यपाल पद रद्द करावे असेही उद्धव ठाकरे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी करत सुप्रीम कोर्टाने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे याबाबतचा निर्णय घेणार आहेत. पण ते सध्या लंडन दौऱ्यावर असल्याने ते भारतात परत आल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे पत्र आज ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पाठविण्यात येणार आहे. तर अध्यक्षांनी कोणतेही नियम न पाहता कायद्याच्या चौकटीत राहून याबाबतचा निर्णय घ्यावा, असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जहरी टीका केली. (Governor’s role disgusting, Uddhav Thackeray’s venomous criticism) तसेच राज्यपालांचे पद बरखास्त करायला हवे, असे मत देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा – Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टाचा निर्णय संभ्रमात टाकणार – राज ठाकरे

- Advertisement -

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला, त्याचप्रमाणे राज्यपाल निवड करताना एक समिती असायला हवी. राष्ट्रपतींच्या माध्यमातून ही नियुक्ती करण्यात येत असली, तरी गेली अनेक वर्ष या पदांवर कोणत्या व्यक्ती येतात, हे पाहता राज्यपालांच्या नियुक्तीसाठी समिती असावी, अन्यथा तोपर्यंत हे पद बरखास्त करण्यात यावे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे.

राज्यपालपदावरून निवृत्त झाल्यानंतर कोश्यारी हे संघाच्या गणवेशात दिसले होते. अशा प्रकारे एखाद्या संस्थेशी वा पक्षाशी संबंधित असलेल्या व्यक्ती या राज्यपालपदी नकोत. जर राज्यपाल हे एखाद्या विशिष्ट विचारधारेशी संबंधित असले की महाराष्ट्र आणि दिल्लीसारखं घडत, असेही ते यावेळी म्हणाले. कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा अवमान केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

ही यंत्राना खरी आणि आदरपूर्वक असायला हवी, जी पूर्वी होती. पण हव्यासापायी याची बरबादी करून टाकली आहे. राज्यपालांची भूमिका ही घृणास्पद आहे. म्हणून जोपर्यंत या राज्यपाल नियुक्तीवर काही नियमावली येत नाही तोपर्यंत सरळ हे राज्यपाल पद रद्द करावे असेही उद्धव ठाकरे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -