उंदराला सापडली चिंधी.., खातेवाटपानंतर गुलाबराव पाटलांचा शिवसेनेला टोला

dont give threats we were born in shiv sena if you give threats it will be answered in same manner sanjay sawant warns gulabrao patil jalgaon

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता अधिवेशनाच्या तोंडावर शिंदे सरकारने खाते वाटप केले आहे. मात्र,मंत्रिमंडळातील खातेवाटपानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप तुपाशी तर शिंदे गट उपाशी, अशी टीका सामनामधून केली आहे. दरम्यान, कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी उंदराला सापडली चिंधी असं म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे.

गुलाबराव पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, खाते कुणाला कोणतं दिलं यापेक्षा सर्व खात्यांवर सर्व खात्यांवर सामूहिक जबाबदारी ही मंत्र्यांची असते. मी जरी पाणीपुरवठा खात्यांचा मंत्री असलो तरी माझी इतर खात्यांवर जबाबदारी आहे. प्रत्येक खात्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची जबाबदारी ही मंत्र्यांची असते, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

पाटलांचा संजय राऊतांना टोला

खाते वाटप करताना थोडं इकडे तिकडे झालं असेल. मात्र उंदराला सापडली चिंधी, इकडे ठेवू की तिकडे ठेवू, असं म्हणत प्रत्यक्ष नाव न घेता गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

मला आधी जे खातं तेच मला आता पुन्हा एकदा मिळालं आहे. माझे पूर्वीचेच खाते मला मिळाल्यामुळे मला फार आनंद झाला आहे. माझी सेकंड इनिंग सुरू होत असल्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत ३४ हजार गावांना पाणी पाजण्याचा मोठा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. त्यामुळे गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे काम करण्यात येणार असल्याचे देखील गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

खातेवाटपात भाजपचा वरचष्मा दिसून येतो? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता. चष्मा तर मी पण घातला आहे, अशी खोचक टीका पाटलांनी विरोधकांवर केली आहे.


हेही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारमधील अर्धा डझन मंत्री नाराज; वजनदार नेत्यांना दुय्यम खाती