घरताज्या घडामोडीMango Festival : हापूस आणि केशर आंब्याची पहिली पेटी जपानला ; टोकियो,...

Mango Festival : हापूस आणि केशर आंब्याची पहिली पेटी जपानला ; टोकियो, जपान येथे आंबा महोत्सवाचे आयोजन

Subscribe

निर्यातीला चालना देत, कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) हंगामातील हापूस आणि केशर आंब्याची पहिली पेटी शनिवार, 26 मार्च रोजी जपानला निर्यात केली. अपेडाकडे नोंदणीकृत असलेल्या मेसर्स बेरीडेल फूड्स (ओपीसी) प्रा.लि. यांनी जपनाच्या लॉसन रिटेल चेनकडे हापूस आणि केशर आंबा निर्यात केला. निर्यात केलेले आंबे अपेडा मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने (MSAMB) प्रक्रिया करून पॅकिंग केले आहेत.

टोकियो, जपान येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय दूतावास आणि इन्वेस्ट इंडिया यांनी आज, 28 मार्च रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. अपेडाने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून व्यापार मेळे (ट्रेड फेअर्स), शेतकऱ्यांसाठी पोर्टल, ई-ऑफिस, हॉर्टिनेट ट्रेसेबिलिटी सिस्टम, खरेदी-विक्री मेळावा, उत्पादन केंद्री मेळावे अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.

- Advertisement -

APEDA ने व्हर्च्युअल व्यापार मेळावे, शेतकरी कनेक्ट पोर्टल, ई-ऑफिस, हॉर्टिनेट ट्रेसेबिलिटी सिस्टम, खरेदीदार-विक्रेता बैठक, रिव्हर्स खरेदीदार-विक्रेता बैठक, उत्पादन-विशिष्ट मोहिमा इत्यादींसाठी आभासी पोर्टल विकसित करून निर्यात प्रोत्साहन उपक्रम आणि पुढाकार घेतला आहे.

कोरोनामुळे तसचे निसर्गाच्या चक्रामुळे आंबा बागायतदारांचे नुकसान झाले. मात्र यातील काहीशी दिलासादायक बाब म्हणजे आता बाजारपेठेतील दर आणि निर्यातील मिळालेली परवानगी यामुळे परकीय चलनाचा आधार शेतकऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान बाजरपठेतील वाढत्या मागणीमुळे उत्पादनात घट झाली असली तरी उत्पन्न वाढवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पार्किंगच्या जागेत भिंत बांधून दहा श्वानांना कोंडले, तीन पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -