घरमहाराष्ट्रदीपाली चव्हाण यांच्या गर्भपातास शिवकुमारच जबाबदार, पोलीस तपासातून माहिती उघड

दीपाली चव्हाण यांच्या गर्भपातास शिवकुमारच जबाबदार, पोलीस तपासातून माहिती उघड

Subscribe

मेळघाटमधील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी डीसीएफ विनोद शिवकुमारसमोरील अडचणीत वाढल्यात. दीपाली चव्हाण गर्भवती असल्याचे माहित असतानाही शिवकुमारने त्यांना दोन दिवस पायी फिरवले. यामुळेचं दीपाली यांचा गर्भपात झाल्याची माहिती पोलीस तपासातून उघड झाले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना वरिष्ठ डीसीएफ शिवकुमार यांनी वारंवार मानसिक त्रास दिला. पोलीस तपासादरम्यान दीपाली यांच्या औषधोपचारांची काही कागदपत्रे समोर आली आहेत. याप्रकरणात काही साक्षीदारांचे जबाबसुद्धा नोंदवण्यात आले आहेत. या साक्षीदार आणि पुराव्यांचा बारकाईने तपास केला असता दीपाली चव्हाण यांच्या गर्भपातास शिवकुमारच जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. शिवकुमार याने अनेकदा दीपाली चव्हाण यांना शिवीगाळ करत निलंबित करण्याच्या धमक्याही देत अपमानित केल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे दीपाली चव्हाण यांना शिवीगाळ करत निलंबित करण्याच्या धमक्याही देत अपमानित केल्याप्रकरणी देखील शिवकुमारवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच शिवकुमारविरोधात आणखी काही गुन्ह्यांची नोंद धारणी पोलिसांनी केली आहे. यात गर्भपातासाठी कारणीभूत, धमकावणे या कलमांतर्गत अनेक गुन्हे नोंद झाले आहेत.

- Advertisement -

हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी २५ मार्च २०२१ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. परंतु आत्महत्येपूर्वी दीपाली यांनी आपल्या सुसाइड नोट लिहिली होती. या सुसाइट नोटमध्ये शिवकुमार आणि रेड्डीविरोधात काही गोष्टी नमूद केल्या होत्या. त्या अनुषंगानं पोलीस तपास सुरू असून रोज नवनवी माहिती पुढं येत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -