घरताज्या घडामोडीनॉन-स्टॉप पावसाची बॅटिंग सुरुच; कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट आणि मुसळधार पावसाचा इशारा...

नॉन-स्टॉप पावसाची बॅटिंग सुरुच; कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट आणि मुसळधार पावसाचा इशारा जाणून घ्या

Subscribe

महाराष्ट्रात पावसानं चांगलंच कमबॅक केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे बळीराजाला दिलासा मिळला असून पिकांची वाढ जोरदार सुरू आहे. महाराष्ट्रात १ जून ते १२ जुलै दरम्यान ३६०.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील आठवडाभर महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकणात दमदार पाऊस बरसत आहे. येणाऱ्या चार दिवसात देखील असाच पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने नोंदवला आहे. कोकणात मुसळधार पावसामुळे नद्या तुडूंब भरून वाहत आहे असून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गावं पाण्याखाली गेली आहेत. धरणातील पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. राजापूर परिसरातील अनेक लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. खेड तालुक्यात पावसाची २४ तासांत दमदार हजेरी लागल्यामुळे जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पण दुसऱ्या बाजूला पावसामुळे भात लागवडीला वेग आला आहे.

- Advertisement -

मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पावसाने पूर्व विदर्भात हजरी लावली असून पश्चिम विदर्भात पावसाचा जोर कमी होता. पण धरणे भरण्यासाठी जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

दोन दिवस कोणत्या जिल्ह्याला रेड अलर्ट?

पुणे
सातारा
कोल्हापूर
रायगड
रत्नागिरी

- Advertisement -

दोन दिवस कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा?

मुंबई
ठाणे
पालघर

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -