विदर्भ, मराठवाड्याला मुसळधार पावसाचा फटका; शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोराचा वारा आणि पावसामुळे सखल भाग जलमय झाले आहेत. तसेच, पूराचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. असे असले तरी, या पावसाचा विदर्भ आणि मराठवाड्याला मोठा फटका बसला आहे.

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोराचा वारा आणि पावसामुळे सखल भाग जलमय झाले आहेत. तसेच, पूराचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. असे असले तरी, या पावसाचा विदर्भ आणि मराठवाड्याला मोठा फटका बसला आहे. विदर्भात पावसाने धुमाकूळ घातल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (heavy rains in marathwada and widharbha huge loss of crops of farmers)

मुबंईसह राज्यभरात बुधवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. सध्या मुंबईसह, ठाणे, पालघर कोकण, मराठवाड्यातील काही जिल्हे, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची संततधार कायम आहे. तसेच, विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

यवतमाळ

 • यवतमाळमधील वणी तालुक्यातील 84 नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
 • वणी तालुक्यातील भुरकी, जुनाड, कवडशी, सावनगी, शिवणी, चिंचोली, जुगाद या गावांना पाण्याचा वेढा आहे.
 • जिल्ह्याच्या दोन दिवसात कोसळलेल्या पावसामुळे राळेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या रामगंगा नदीला पूर आला आहे.
 • पुरामुळं झाडगाव परिसरातील मोठ्या प्रमाणात जमीन खरडून गेली आहे.
 • राळेगाव तालुक्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
 • शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर हे उभ पीक आणि माती पूर्ण पाने वाहून गेल्यामुळे शेतकरी पुरता खचून गेला आहे.

रत्नागिरी

 • रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची संततधार कायम आहे.
 • चिपळूणमध्ये चांगला पाऊस पडत असून, या पावसामुळे चिपळूणला मोठा फटका बसला.

वर्धा

 • वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
 • प्रसिद्ध आजनसरा देवस्थानाला पुराचा मोठा फटका बसला आहे.
 • मंदिरात पाणी शिरल्याने मंदिर प्रशासनाकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे कार्य सुरु आहे.
 • हिंगणघाट तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थानात मोठ्या प्रमाणात पुराचे
 • पाणी शिरल्यामुळे मंदिराचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 • मुसळधार पाऊस बरसल्यामुळं नद्यांना पूर आला आणि पुराचे पाणी हे थेट मंदिर परिसरात शिरलं आहे.

अकोला

 • अकोला जिल्ह्यात संततधार पाऊस बरसल्याने हैद्राबाद आणि मध्यप्रदेशला जोडणारा अकोला-अकोट महामार्ग पूर्णा नदीवरील गांधीग्रामच्या पुलावरुन पाणी जात आहे.
 • गेल्या 24 तासंपासून बंद पडला होता. मात्र आता पूर ओसारल्याने वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

चंद्रपूर

 • चंद्रपूर शहरातील सिस्टर कॉलनी, रहेमतनगर सारख्या इरई नदी काठच्या भागात पुन्हा पुराचे पाणी शिरले आहे.
 • गेल्या आठवड्यात पूर आल्यानंतर नुकतीच नागरिकांनी घरांची स्वच्छता केली होती.
 • पाऊस नसताना वर्धा नदी आणि तिच्या उपनद्यांना पूर आला आहे.
 • वर्धा-यवतमाळ जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं वर्धा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे.

बुलढाणा

 • बुलढाणा जिल्ह्यातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
 • पूर्णा नदीला पूर आल्यामुळं लगतच्या छोट्या नदी पात्रात पुराचं बॅक वॉटर घुसल्यानं पूर्णा नदी काठच्या गावांना पूर परिस्थिचा सामना करावा लागत आहे.
 • मलकापूर तालुक्यातील काळेगाव येथील विश्वगंगा नदीला आलेल्या पूर्णा नदीच्या पाण्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून काळेगाव चा संपर्क तुटला आहे.

मराठवाडा

 • गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही बसला आहे.
 • जवळपास 3 लाख 38 हजार 88 हेक्टरचे नुकसान झाले.
 • याचा 3 लाख 51 हजार 499 शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
 • सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले आहे.
 • नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने सुरु केली आहेत.

हेही वाचा – सत्तासंघर्षाची सुनावणी आता १ ऑगस्टला