घरताज्या घडामोडीगॅंगस्टर रवी पुजारी नेहमीच चेहरा, नाव बदलत राहिला, मुंबई पोलिसांवरही फ्रेंच भाषांतराची...

गॅंगस्टर रवी पुजारी नेहमीच चेहरा, नाव बदलत राहिला, मुंबई पोलिसांवरही फ्रेंच भाषांतराची वेळ आणली

Subscribe

गॅंगस्टर रवि पुजारीचा ताबा आता मुंबई पोलिसांनी घेतला आहे. मुंबई पोलिसांच्या टीमने रवी पुजारीला लॉकअपमध्य नेण्याआधी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. मंगळवारी मकोका कोर्टात नेण्यासाठी मुंबई पोलिसांनी रवी पुजारीचा ताबा घेतला आहे. कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशानंतर रवि पुजाराला मुंबई पोलिसांची कस्टडी मिळाली होती. मुंबई पोलिसांनी पुजारासाठी केलेल्या कस्टडीच्या मागणीनंतरच रवी पुजारीला कर्नाटक पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ravi-pujari

- Advertisement -

रवी पुजारीवर महाराष्ट्रात एकुण ४९ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २६ प्रकरण ही मकोका अंतर्गत नोंदविण्यात आली आहेत. रवि पुजारीला २०२० साली पश्चिमी आफ्रिकेतील सेनेगल येथून अटक करण्यात आली होती. रवी पुजारी हा एकुण १५ वर्षे फरार होता. या कालावधीत रवी पुजारीचा अनेकदा बदललेला लुक समोर आला आहे. मंगळवारी मुंबईतल्या मकोका कोर्टात नेताना रवी पुजारीचा नवा लुक समोर आला आहे.

ravi pujari

- Advertisement -

मुंबई पोलिसांना का हवी होती रवि पुजाराची कस्टडी ?

छोटा राजनचा अत्यंत विश्वासू अशा साथीदारांपैकी एक म्हणजे रवी पुजारी. पण छोटा राजनपासून रवी पुजारी २००० सालीच वेगळा झाला. त्यानंतर रवी पुजारीने सक्रीय होत बॉलिवुडमधील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या मदतीने आणि बिल्डरांच्या मदतीने पैसे वसुल करण्याचा धडाका लावला. त्यामध्ये महेश भट यांच्या हत्येचा कट रचणे तसेच चित्रपट फायनान्सर अली मोरानी यांच्या बंगल्यावरील गोळीबाराशीही रवि पुजाराचे नाव जोडले गेले होते.

Ravi-Pujari

काही महिन्यांपूर्वीच रवि पुजाराचा सहकारी असलेला ओबेद रेडियोवाला याला अमेरिकेने भारताकडे प्रत्यर्पित केले होते. रवी पुजारीची पोलिस कस्टडी ही प्रामुख्याने २०१६ सालच्या गजाली शूटआऊट केसमध्ये हवी होती. गजाली हे विलेपार्ले येथील एक हॉटेल आहे. या गजाली शूट आऊटमधील सात आरोपी आतापर्यंत अटकेत आहेत. तर रवि पुजाराला दोन वर्षे आधीच सेनेगल येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर काहीच महिन्यात रवी पुजारीची कस्टडी ही भारताकडे देण्यात आली.

ravi pujara

मुंबईतच रवि पुजारावर ७८ केसेस

एकट्या मुंबईत रवी पुजारीवर ७८ केसेस नोंद करण्या आल्या आहेत. त्यामध्ये ४९ प्रकरणात रवि पुजाराचा थेट संबंध आहे. अनेक प्रकरणात रवि पुजारावर मकोका लावण्यात आला आहे. मुंबई क्राईम ब्रांच एक एक अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकरणात रवी पुजारीची कस्टडी घेणार आहे. त्यामुळे रवी पुजारीचा येत्या काही दिवसात मुंबई पोलिसांच्या लॉकअपमध्येच मुक्काम असणार आहे. त्यानंतर पुन्हा रवी पुजारीची रवानगी कारागृहात करण्यात येईल. कर्नाटकात रवी पुजारीविरोधात ९७ केसेस आहेत.

ravi-pujari

 

दोन डझन केसेसचा फ्रेंच भाषेत अनुवाद

दोन वर्षापूर्वी जेव्हा रवी पुजारीला सेनेगल येथे अटक करण्यात आली होती, तेव्हा भारताकडे प्रत्यर्पणाचा प्रयत्न सुरू झाला. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने त्यावेळी दोन टप्प्यात जवळपास २४ केसेसचा इंग्रजी अनुवाद करून पाठवला होता. सीबीआयकडून या प्रकरणांचे फ्रेंच भाषांतर करून सेनेगलला पाठवण्यात आले.

crime branch arrested ravi pujari


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -