घरठाणेठाण्यातील धक्कादायक प्रकार; पत्नी नांदत नाही म्हणून झालेल्या भांडणात मैत्रिण ठार

ठाण्यातील धक्कादायक प्रकार; पत्नी नांदत नाही म्हणून झालेल्या भांडणात मैत्रिण ठार

Subscribe

पत्नी नांदत नाही म्हणून झालेल्या भांडणात मध्यस्थी केलेल्या मैत्रिणीवर पतीने धारदार शस्त्राचा वापर केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ठाण्यातील मुंब्रा परिसरात रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्या मैत्रिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवा आगासन परिसरात १५ मे रोजी घडला. मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास पोलीस बिट मार्शल या ठिकाणी गस्त घालत असताना त्यांना एक महिला जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभी असलेली आढळून आली. या महिलेची चौकशी केली असता किरण खंदारे असं तिचं नाव आहे. किरण खंदारेंनी ही संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली.

- Advertisement -

आरोपीचं नाव नागेश रुपवते असं आहे. नागेश रूपवते आणि किरण खंदारे यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. कौटुंबिक वादामुळे मागील काही महिन्यांपासून नागेश रूपवतेची पत्नी तिची मैत्रीण ज्योती सोनकर हिच्याकडे पाटील अपार्टमेंटमध्ये राहात होती. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास नागेश ज्योतीच्या घरी आला. त्यानंतर त्याने त्याची पत्नी किरणला आपल्यासोबत नांदण्यास का येत नाही? या कारणावरून वाद सुरु केला. मात्र, हे भांडण एवढ्या विकोपाला गेले की, नागेशने त्याच्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ज्योती सोनकरने पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी केल्यामुळे नागेशने ज्योतीच्या गळ्यावर व पोटावर वार करत तिची हत्या केली. त्यानंतर आरोपी नागेशने घटनास्थळावरून पोबारा केला.

दरम्यान, या सदर प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली असता पथकाने दोन्ही जखमींना ऍम्ब्युलंसच्या सहाय्याने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मात्र, डॉक्तरांनी ज्योती सोनकर हिला मृत घोषित केले. यावेळी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : मंत्रिपदांसाठी वेगवान हालचाली सुरू, सर्वाधिक इच्छुक दक्षिण महाराष्ट्रातले ‘हे’ आमदार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -