घरमहाराष्ट्रमी हातात बांगड्या भरल्या नाहीत; जे करायचं आहे ते करणारच, उदयनराजेंचा इशारा

मी हातात बांगड्या भरल्या नाहीत; जे करायचं आहे ते करणारच, उदयनराजेंचा इशारा

Subscribe

आधी देशाचे तीन तुकडे झाले होते आता किती तुकडे होतील याचा विचार करा.

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांसंदर्भांत जे वक्तव्य केले त्याचे पडसाद उमटू लागले आहेत अशातच खासदार उदयराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकार परिषदेला सुरुवात कारण्यापूर्वी त्यांनी शिवाची महाराजांना अभिवादन केले.

यावेळी उदयनराजे म्हणाले, आम्ही गहिवरलो म्हणजेच आम्ही हतबल झालो नाही किंवा आम्ही हातात बांगड्या सुद्धा भरल्या नाहीत वेळप्रसांगी काय करायचे ते आम्ही ठरवू पण इतरांनीही त्याचा विचार केला पाहिजे, असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला आणि संपूर्ण जगाला लोकशाहीचा मार्ग दाखविला. राज्यकारभारात जनतेचा सहभाग असावा, विविध जाती धर्मातील लोकांना न्याय मिळावा म्ह्णून शिवाजी महाराजांनी त्याकाळी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. शिवाजी महाराजांचा तोच विचार घेऊन देशभरातील विविध जाती धर्मातील लोकं एकत्र आले आणि स्वराज्याची स्थापना झाली. त्यालाच आपण आता लोकशाही असे म्हणतो. असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील पक्ष हल्ली शिवाजी महाराज यांचे नाव घेतात, आदर्श मानतात. सर्वधर्म समभावची व्याख्या आता बदलली आहे का? सर्वधर्म समभाव असे म्हणत शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे पण जे काही आपल्या सोईचे आहे त्याप्रमाणे वागायचे हे कितपत योग्य आहे असे म्हणत उदयनराजे यांनी मोठा प्रश्नसुद्धा यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

- Advertisement -

तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणत नाहीत मग ठीक ठिकाणी त्यांचे नाव घेऊन तरी काय उपयोग आहे. अशा परिस्थिती प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट समाजापुरता किंवा व्यक्तीकेंद्रित विचार करायला लागला तर समाज तेढ निर्माण होणारच आणि देशाचे तुकडे होणार असेही उदयनराजे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आज पर्यंत देशाला अखंड ठेवलं आहे. संपूर्ण जगात एक मोठी लोकशाही म्ह्णून भारताकडे पहिले जाते. ज्या शिवाजी महाराजांनी सर्व जाती – धर्मातील लोकांना एकत्र ठेवल त्याच शिवाजी महाराजांच्या आज अपमान होत आहे. हे जरा का असेच चालू राहिले तर आधी देशाचे तीन तुकडे झाले होते आता किती तुकडे होतील याचा विचार करा. असे उदयनराजे भोसले म्हणाले.

याच संदर्भांत बोलताना, आपण एवढे कोडगे झालो आहोत का की, ज्यांचे नाव वापरले जाते त्यांच्यावरच चिखलफेक होत असताना आपण शांतपणे बघत बसायचे? असा संतापजनक प्रश्न उदयनराजे यांनी उपस्थित केला. यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण जरा का असेच चालू राहिले तर आपण पुढल्या पिढीला काय शिकणार असेही उदयनराजे म्हणाले.


हे ही वाचा – शिवप्रतापदिनी उदयनराजे प्रतापगडावर अनुपस्थित; खंत व्यक्त करत म्हणाले…

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -