घरमहाराष्ट्रअजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर एकनाथ खडसे म्हणाले...

अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर एकनाथ खडसे म्हणाले…

Subscribe

मुंबई | अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यासाठी २०२४ ची गरज काय, असेही ते म्हणाले होते. अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दुजोरा देत त्यांच्या सीएमपदाचे राजकीय गणित मांडले आहे.

“सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरविले जाण्याची शक्यता आहे. त्या १६ आमदारांत मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांचे देखील नाव आहे. तसे झाल्यास राज्यातील शिंदे सरकार देखील कोसळेल. तेव्हा ज्यांच्याकडे सर्वाधिक बहुतम असेल, त्यांनाच राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी बोलवावे लागणार आहे. राज्यपालांना एका क्षणात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही. त्यावेळी आकड्यांचा खेळ होईल. त्यात महाविकास आघाडीचे अजित पवार यांना नेतृत्व करण्याची संधी दिली जाऊ शकते”, अशी भविष्यवाणी एखनाथ खडसेंनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – घोटाळेबाज गद्दारांना भाजप का पाठिंबा देतं? आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

अजित पवार हे भाजपसोबत जाणार का? या प्रश्नावर एकनाथ खडसे म्हणाले, “अजित पवार पक्ष सोडून भाजपमध्ये जातील, असे मला वाटत नाही. राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांना मान आणि सन्मान आहे. अजित पवारांनी अनेकदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. तसेच वर्षानुवर्ष त्यांनी पक्षासाठी काम करून पक्ष उभा केला आहे. त्यामुळे अजित पवार हे भाजपसोबत जातील असे मला वाटत नाही”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

- Advertisement -

फडणवीस हे आमच्या मनातील मुख्यमंत्री – राधाकृष्ण विखे पाटील

देवेंद्र फडणवीस हे आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असे विधान राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “आमच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे चांगले नेते आहेत. परंतु, आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत.” आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे जळगावच्या सभेत काय बोलणार, याकडे सर्वाचे लक्ष लागेल आहे.

हेही वाचा – अतिकचे हत्याकांड घडवून मलिक यांचा स्फोट दडपण्याचा प्रयत्न, संजय राऊत यांची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -