घरमहाराष्ट्रतर अन्वय नाईक वाचले असते; नाईक कुटुंबियांचा आरोप

तर अन्वय नाईक वाचले असते; नाईक कुटुंबियांचा आरोप

Subscribe

अन्वय नाईकांच्या हत्या प्रकरणाचा पाठपुरावा करू नये म्हणून आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या विरोधात दादर आणि मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. मात्र, दबावामुळे या तक्रारींची जराही दखल घेण्यात आली नाही. अखेर न्यायालयात जावे लागले. न्यायालयाला आदेश काढावे लागले. अर्णब गोस्वामीवर झालेली कारवाई म्हणजे अन्वय नाईक यांना मिळालेला न्याय होय, अशा भावना अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी व्यक्त केल्या. वेळीच कारवाई झाली असती तर अन्वय आणि त्यांच्या आईचा जीव वाचला असता, अशा भावना अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी व्यक्त केल्या.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक या मायलेकींनी पत्रकार परिषद घेतली. गाडीवर दोन बाटल्या फेकून मारल्या, तर त्रास होतो. माझ्या घरातील दोन प्रियजन गेले आहेत, त्याचे ह्यांना काय, असे अक्षता यांनी विचारले. ज्यांनी हे घडवून आणले त्यांना झालेली अटक (गोस्वामींची अटक) हे याचेच फळ आहे, असे भावना नाईक म्हणाल्या. अन्वय यांनी सुसाईड नोटमध्ये तिघांची नावे लिहिली होती, पण त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नव्हती. यासाठी मला न्यायालयात जावे लागले. न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली, मी त्यांची शतश: आभारी आहे, असे अक्षता नाईक म्हणाल्या.

- Advertisement -

अर्णव गोस्वामींसारखी मासे काम करुन घेतात आणि पैसे देत नाहीत. अर्णव यांनी सूडबुद्धीने हे सर्व केले आहे, माझ्या पतीला पैसे मिळाले असते तर ते जीवंत असते, ८३ लाख रुपये बाकी आहेत, फिरोजकडून चार कोटी, इतरांकडून येणे होतं, पण तेही देऊ नका, असे अर्णवने सांगितल्याचा दावा अक्षता नाईक यांनी केला.
आम्ही जगायचे नाही का, की फक्त अर्णव गोस्वामीला जगायचा अधिकार आहे? पत्रकारिता अशी असते का? आमचे फोन टॅप केले होते, आम्ही संजय बर्वे, सुरेश वऱ्हाडे यांनाही भेटलो होतो. अर्णव गोस्वामींना अटक झाली हे बरेच झाले, त्या तिघांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत, त्यांना यापूर्वीच अटक व्हायला हवी होती, मात्र का झाली नाही, असेही अक्षता नाईक यांनी विचारले.

सुशांतसिंहबाबत एवढे सांगितले जास्त होते, त्यावेळी माझ्या पतीने तर त्यांची सुसाईड नोटमध्ये नाव लिहिले आहे, तरीही कारवाई झाली नाही. भारतातील लोकांनी सत्याचे समर्थन केले पाहिजे, यात राजकीय हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आमचे प्रकर भटकवण्याचा प्रयत्न झाला आहे, मोदींनाही पत्र लिहिले होते, अशी माहिती अक्षता नाईक यांनी दिली.

- Advertisement -

नाईक आत्महत्या प्रकरण काय?

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पनवेल पोलिसांनी अर्णव गोस्वामींना अटक केली. अन्वय यांच्या कॉनकॉर्ड कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते. कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णव गोस्वामींसह इतरांना विनंती केली होती. मात्र अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. अर्णव गोस्वामी यांनी पैसे थकवल्याने अन्वय नाईक यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप पत्नी अक्षता नाईक यांनी केला आहे.

अन्वय यांनी त्यांच्या आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नाव्ह लिहिली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -