अनेक ठिकाणी तिरंगे कचऱ्याच्या पेटीत पडलेले दिसले : नाना पटोले

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' मोहिमेंतर्गत घरोघरी तिरंगा फडकवण्यात आला. मात्र, अनेक ठिकाणी तिरंगा कचऱ्याच्या पेटीत पडल्याचे दिसले, असे कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत म्हटले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत घरोघरी तिरंगा फडकवण्यात आला. मात्र, अनेक ठिकाणी तिरंगा कचऱ्याच्या पेटीत पडल्याचे दिसले, असे कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत म्हटले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले. (In many places the tricolour was seen lying in the garbage box)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेकांनी तिरंगे लावले. परंतु, काही तिरंगे ही कचऱ्याच्या पेटीत पडल्याते आमच्या निदर्शनास आले आहेत. त्यामुळे तिरंग्याचा अपमान झाला आहे. त्यामुळे माझी राज्य शासनाकडे विनंती आहे, की त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायत असतील, नगरपालिका असतील, जिल्हापरिषद असतील आणि महापालिका असतील यांनी सगळ्यांना तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी दखल घ्यावी. तसेच, शासनाने यासंदर्भात निवेदन काढावे अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

“हर घर तिरंगा मोहीम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आम्हाला कुठेही तिरंग्याचे अपमान झाल्याचे निदर्शास आले नाही. मात्र नाना पटोले यांच्या म्हणण्यानुसार, तिरंगा कचारापेठीत अथवा त्याचा अपमान झाल्याचे निदर्शास आल्यास त्यावर त्वरीत कारवाई केली जाईल”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खूप उत्साहाने साजरा करण्यात आला.(independence day 2022) देशभरातच अनेक उपक्रम राबविले गेले. केंद्र सरकारकडूनही विविध उपक्रम देशभरात राबविले गेले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशवासीयांना घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘हर घर तिरंगा'(har ghar tiranga) अभियान देशभरात सुरु केले. ज्याला देशवासीयांनी उदंड प्रतिसाद दिला.