घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये व्यापाऱ्याला लुटले; लाखोंचा मुद्देमाल लंपास  

पिंपरी-चिंचवडमध्ये व्यापाऱ्याला लुटले; लाखोंचा मुद्देमाल लंपास  

Subscribe

२ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम आणि ५० तोळे सोन्याचे (मिक्स) दागिने घेऊन अज्ञात दुचाकीस्वारांनी पोबारा केला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी १०च्या सुमारास अज्ञात दोघांनी व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. यामध्ये २ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम आणि ५० तोळे सोन्याचे (मिक्स) दागिने घेऊन अज्ञात दुचाकीस्वारांनी पोबारा केला आहे. त्यांचा शोध पिंपरी पोलीस आणि गुन्हे शाखा एक चे अधिकारी घेत आहेत. रवी मेहता (वय-७१) असे व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे.

मेहता यांच्या हाताला दुखापत

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीच्या मुख्य चौकात एका व्यापाऱ्याला अज्ञात दोघांनी भरदिवसा लुटल्याची घटना घडली आहे. रवी मेहता हे मूळ पंजाब येथील आहेत. मेहता हे सोन्याचे आणि चांदीच्या दागिनांची परराज्यात विक्री करतात. ते पिंपरी-चिंचवड शहरात रात्री मुक्कामी आले होते. सकाळी १०च्या सुमारास २ लाख ८० रोख रक्कम आणि ५० तोळे सोन्याचे (मिक्स) दागिने घेऊन ते चिंचवडला जाणार होते. रवी मेहता हे चालत पिंपरी चौकात जात होते. तेव्हा, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी त्यांच्या हातातील सुटकेस चोरली. या घटनेत मेहता यांच्या हाताला मुका मार लागला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून अज्ञात चोरांचा पिंपरी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, भर दिवसा अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा –  कल्याण डोंबिवलीकर प्रवाशांचे पाच तास मेगा हाल; रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -