घरताज्या घडामोडीकोरोना इफेक्ट: विकास कामांचे उद्घाटने, भूमिपूजने ऑनलाईनच

कोरोना इफेक्ट: विकास कामांचे उद्घाटने, भूमिपूजने ऑनलाईनच

Subscribe

भाजप गटनेते जगदीश पाटील यांचा प्रस्ताव; कॉम्पूटर विभाग तयार करणार सॉफ्टवेअर, फडणवीसांच्या उपस्थितीतील कार्यक्रमही ऑनलाईन करण्याचे नियोजन

महापालिकेची निवडणूक अवघ्या वर्षावर येऊन ठेपलेली असताना कोरोनामुळे मात्र विकास कामांच्या उदघाटनांना आणि भूमीपूजन कार्यक्रमांना ‘ब्रेक’ लागला आहे. यावर भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी नामी शक्कल लढवली असून ही उदघाटने आणि भूमिपूजने ऑनलाईन स्वरुपात करण्याचा प्रस्ताव त्यांनी महापौरांना दिला आहे. त्यामुळे आगामी काळात उदघाटने आणि भूमिपूजनांचा बार ऑनलाईन पद्धतीनेच उडेल हे जवळपास निश्चित झाले आहे.
निवडणुकीपर्यंत जास्तीत जास्त विकासकामे मंजूर करीत मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. गेल्या महिन्यापासून शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांचा प्रारंभ शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात येत आहे. तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनाही शिवसेनेने महापालिकेत आमंत्रित केले होते. याचवेळी भाजपला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकासकामांचा बार उडवून द्यायचा होता. परंतु, मधल्या काळात कोरोनाचे सावट आल्याने राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांचा हिरमोड झाला. त्यावर उपाय म्हणून भाजपने आता आॉनलाइन पद्धतीने विकासकामांचा प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मनपाच्या संगणक विभागाला सॉफ्टवेअर तयार करण्यास सांगण्यात आले असून, त्याचा डेमो तयार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची वेळ व तारीख निश्चित करून विकासकामांचा बार उडवून देण्यात येणार आहे.

Jagadish Patil
Jagadish Patil

कोरोनामुळे सध्या केंद्र व राज्य शासनाकडून आॉनलाइन पद्धतीने विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटने केली जात आहेत. याच धर्तीवर महापालिकेच्या विकासकामेही ऑनलाईन पद्धतीने सुरु होऊ शकतात.
जगदीश पाटील, गटनेता, भाजप 

 

कोरोना इफेक्ट: विकास कामांचे उद्घाटने, भूमिपूजने ऑनलाईनच
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -