घरठाणेठाण्यात पावसामुळे खड्ड्यात वाढ; आकड्याने गाठला बाराशेचा टप्पा

ठाण्यात पावसामुळे खड्ड्यात वाढ; आकड्याने गाठला बाराशेचा टप्पा

Subscribe

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस खड्ड्यांची संख्या वाढताना दिसून शहरातील एकूण खड्ड्यांच्या आकडाने बाराशेचा टप्पा गाठला आहे. त्यापैकी १ हजार ६ खड्डे भरल्याचा दावा महापालिकेने केलेला आहे. तर १४३ इतके अजूनही शिल्लक असल्याचे म्हटले आहे. दिव्यात सर्वाधिक ४१३ खड्डे पडले होते, त्यामधील अवघे १३ खड्डे भरायचे बाकी आहेत. तर उर्वरित ४०० खड्डे भरल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. उथळसर,कळवा,वागळे आणि वर्तकनगर या प्रभाग समितीत खड्ड्यांनी १०० चा आकडा पार केल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे.

पावसाळा सुरु झाला की, शहरातील विविध भागात खड्डे पडण्यास सुरुवात होत असते. पावसाळ्यापूर्वीच ठाणे महापालिकेने एमएमआरडीए, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरणाची बैठक घेऊन त्यांच्या मालकीच्या रस्त्यावरील खड्डे आपआपले बुजवावे अशा सुचना दिल्या होत्या. त्यानंतरही ठाणे महापालिका हद्दीत देखील शहराच्या विविध भागात खड्डे पडल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर आता महापालिका हद्दीत खड्ड्यांची संख्या मागील काही दिवसात वाढल्याचे दिसून आले. ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरातील विविध रस्त्यांचा सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये कोणत्या रस्त्यावर किती खड्डे पडले आहेत, किंवा कोणत्या प्रभाग समितीत खड्डे आहेत, याची माहिती घेण्यात आली होती.

- Advertisement -

दरम्यान महापालिका हद्दीत ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले असतील त्याची माहिती घेऊन पालिकेने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. २६ जुलैपर्यंत खड्ड्यांची संख्या ही ९६५ एवढी होती. त्यामध्ये वाढ होऊन ती आता १ हजार १४९ इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक खड्डे हे दिव्यात पडले असून त्यापाठोपाठ कळवा, वर्तकनगर प्रभाग समितीत खड्डे पडले आहेत. सर्वात कमी खड्डे हे मुंब्र्यात पडले असून तेथे अवघे ४३ खड्डे पडल्यानंतर अद्यापही १७ खड्ड्यांची मलमपट्टी करणे बाकी असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.

प्रभाग समिती – पडलेलेखड्डे – बुजविलेले खड्डे – शिल्लक खड्डे
दिवा – ४१३ – ४०० – १३
वर्तकनगर – ११५ – १०३ – १२
उथळसर – १०३ – ९३ – १०
नौपाडा कोपरी – ९६ – ७६ – २०
वागळे – १०५ – ९० – १५
कळवा – ११६ – १०५ – ११
मुंब्रा – ४३ – २६ – १७
माजीवडा मानपाडा-९५ -६६- २९
लोकमान्य सावरकर- ६३ – ४७ – १६
—————————————————
एकूण – ११४९ – १००६ – १४३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -