घरमहाराष्ट्रअमृत काळात भारत ठरणार आधुनिक विज्ञानाची सर्वात मोठी प्रयोगशाळा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास

अमृत काळात भारत ठरणार आधुनिक विज्ञानाची सर्वात मोठी प्रयोगशाळा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास

Subscribe

नागपूर येथे १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे मंगळवारी उद्घाटन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  विद्यापीठाच्या आवारात हा सोहळा पार पडला. ७ जानेवारीपर्यंत येथे विविध विज्ञान विषयक चर्चासत्रे व सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी सक्सेना, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.

नागपूरः भारतीय विज्ञान काँग्रेसची ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’, ही मध्यवर्ती संकल्पना औचित्यपूर्ण आहे. महिलांनी सहभाग दिल्यानेच देशात विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासाला नवी गती प्राप्त झाली आहे. अमृतकाळात भारत देश आधुनिक विज्ञानाची जगातील सर्वात मोठी प्रयोगशाळा ठरेल, असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
नागपूर येथे १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे मंगळवारी उद्घाटन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या आवारात हा सोहळा पार पडला. ७ जानेवारीपर्यंत येथे विविध विज्ञान विषयक चर्चासत्रे व सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी सक्सेना, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, येत्या २५ वर्षात भारत कोठे असेल याचे अनुमान करण्यात विज्ञानाची भूमिका मोलाची आहे. ज्यावेळी वैज्ञानिक संशोधनाला देशसेवेच्या भावनेची जोड मिळते त्यावेळी मिळणारे परिणाम अभूतपूर्व असतात. आपण सध्या विकसीत देशांच्या ग्लोबल इनोव्हेशन यादीत ४० व्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. पीएचडी करण्याबाबतही आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत. स्टार्टअप देशांच्या इकोसिस्टिम यादीत आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत.

- Advertisement -

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने शाश्वत विकास आणि महिला सक्षमीकरण हे शब्द जोडले आहेत. हे खरेच आहे की, महिलांच्या सहभागामुळे विज्ञान तंत्रज्ञानाला नवी गती प्राप्त झाली आहे. येत्या जी २० परिषदेचे यजमानपद भूषवित असतांनाही आपण महिलांच्या पुढाकारातून विकास हे सूत्र ठरविले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, निर्यातीत वाढ केल्यास आपण आर्थिक महासत्ता बनू शकतो. त्यात विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे मोलाचे योगदान असू शकते. देशात अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर्सची बनविण्याचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न साकारण्याचा आधार विज्ञानाची प्रगती असू शकेल.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, देशात आज ८० हजारहून अधिक स्टार्टअप झाले आहेत. समुद्रतळातील शोध घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी डीप ओशियन मिशनला चालना दिली. अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रालाही मोदी यांनी चालना दिली. त्यात खाजगी क्षेत्राला सहभागी होण्याची संधी दिली.

यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, भारतात वैज्ञानिक परंपरा प्राचीन आहे. प्राचीन काळातही भारत जगाच्या पुढे होता. आधुनिक काळातही भारतात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्याचा प्रमुख आधार विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती हाच आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलन, जाती भेद निर्मूलन क्षेत्रात कार्य केले. ग्रामविकासाचे कार्य करताना विवेकवादी विचारांचा प्रचार केला. त्यांच्या नावाच्या विद्यापीठात ही काँग्रेस होणे हे महत्त्वाचे आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या या भारतीय विज्ञान काँग्रेसची मध्यवर्ती संकल्पना ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’, ही आहे. आज महिला सक्षमीकरणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ताकद हीच लिंगसमानता साधू शकते.

 

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -