घरताज्या घडामोडीमी स्वतःच्या पगारातही २५ टक्के कपात केली - CEO Indigo

मी स्वतःच्या पगारातही २५ टक्के कपात केली – CEO Indigo

Subscribe

करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक सावटामुळे आता पहिला फटका विमान कंपन्यांना बसला आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ५ टक्क्यांपासून ते २५ टक्के पगार कपात करण्याचा निर्णय आज इंडिगोमार्फत जाहीर कऱण्यात आला आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केलेली ही मोठी कपात म्हणून समोर आली आहे. करोना व्हायरसमुळे इंडिगो एअरलाईन्सच्या व्यवसायावर मोठा फटका बसला आहे. इंडिगो कंपनीने आपल्या पायलट्सला लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून कंपनीची आर्थिक स्थिती समोर आली आहे. इंडिगोने लिहिलेल्या पत्रात कंपनी आपली सेवा बंद करण्याची तयारी करत असल्याचे नमुद केले आहे. म्हणूनच कंपनीने मोठ्या प्रमाणात कामगार कपात आणि पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ही २५ टक्क्यांपेक्षा कमी पगार घेतील असे रोनोजय दत्ता यांनी जाहीर केले आहे.

करोनाचा परिणाम हा एअरलाईन्सच्या उत्पन्नावर झालेला आहे. त्यामुळेच येत्या दिवसात आणखी काही कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. संपुर्णपणे देशाच्या सीमा विमान वाहतुकीचा बंद करण्याचा थेट परिणाम हा एअरलाईन्सवर झालेला आहे. म्हणूनच अनेक कंपन्यांनी आपल्या ऑपरेशनमध्ये कपात करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

- Advertisement -

काय म्हंटल आहे ईमेलमध्ये ?

आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होत आहे. कोणतीही कंपनी या ढासळणाऱ्या आर्थिक स्थितीला सहन करू शकत नाही. गेल्या वर्षी कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारावर ३२१० कोटी रूपये खर्च केले होते. कंपनीच्या एकुण उत्पन्नाच्या ११ टक्के हा खर्च आहे.

- Advertisement -

Your well-being is of utmost priority to us and here is how we are ensuring the aircraft you fly in maintains the highest standards of hygiene! #LetsIndiGo #IndiGoCares pic.twitter.com/QbbUUR7H1P

— IndiGo (@IndiGo6E) March 18, 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -