घरताज्या घडामोडीकरोनाच्या पार्श्वभूमीवर एसी लोकल पाठोपाठ 'ही' सेवाही राहणार बंद

करोनाच्या पार्श्वभूमीवर एसी लोकल पाठोपाठ ‘ही’ सेवाही राहणार बंद

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवशाही बसेस ३१ मार्चपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

महाराष्ट्रात करोना बाधितांचा आकडा आज, ४९ वर पोहोचला असून मुंबईतील दोन महिलांना या करोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही संख्या वाढत असतानाच एसटी महामंडळ प्रशासनाने एक महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये, याकरता एसटी महामंडळ प्रशासनाने एसटी महामंडळातील भाडेतत्त्वावर घेतलेल्या शिवशाही बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवशाही बसेस येत्या मार्च अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

दंत सेवाही बंद राहणार

दरम्यान, देशात उद्भवलेल्या करोना (कोवीड -१९) या विषाणुच्या प्रसारावर आळा बसावा यासाठी दंतवैद्य क्षेत्रातील डॉक्टरांनी अनावश्यक आणि तातडीच्या नसलेल्या दंत सेवा ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवाव्यात. त्याचबरोबर आपात्कालीन परिस्थितीत सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना भारतीय दंत संघटने (इंडियन डेंटल असोसिएशन) चे अध्यक्ष डॉ. रविंद्र सिंह यांनी दंतवैद्य चिकित्सकांना दिल्या आहेत.

- Advertisement -

एसी लोकल मार्च अखेरपर्यंत बंद

करोनाचा संसर्ग होऊ नये, याकरता पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर नॉन – एसी लोकल नेहमीप्रमाणे धावणार आहे. विशेष म्हणजे ही एसी लोकल येत्या मार्च अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – क्वारंटाईनचा शिक्का घ्या, नाही तर दंड होणारच!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -