घरमहाराष्ट्रदावोसला काय करार होतात माहिती आहे, त्यापेक्षा गुजरातला जा; राऊतांचा शिंदेंना खोचक...

दावोसला काय करार होतात माहिती आहे, त्यापेक्षा गुजरातला जा; राऊतांचा शिंदेंना खोचक टोला

Subscribe

Sanjay Raut taunt to Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जावं, असा खोचक टोला लगावला आहे. तसंच, दावोसला जाऊन कसे करार होतात हे आम्हाला माहिती आहे, असंही संजय राऊत म्हणाले. आज माध्यमांशी त्यांन मुंबईत संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

Sanjay Raut taunt to Eknath Shinde | मुंबई – स्वित्झर्लंड येथील दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळासमवेत सहभागी होणार आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जावं, असा खोचक टोला लगावला आहे. तसंच, दावोसला जाऊन कसे करार होतात हे आम्हाला माहिती आहे, असंही संजय राऊत म्हणाले. आज माध्यमांशी त्यांन मुंबईत संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

हेही वाचा – डाव्होसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री सहभागी होणार; महाराष्ट्राचे व्हिजन मांडणार

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, दावोसमधून काय येतंय ते माहित नाही, पण तुमच्या नाकाखालून उद्योग गेलेत ते आधी आणा. गुजरात आणि इतर राज्य जे उद्योग घेऊन गेलेत, ते घेऊन आलात तर डाव्होसला जाण्यात अर्थ आहेत. दावोसला कसे करार होते ते आम्हाला माहितेयत. दावोसला जाऊन किती करार केले आणि किती कंपन्या आल्या ते कोणी प्रूव्ह करू शकलेलं नाही. वेदांत फॉक्सकॉन, एअरबस, ड्रग्सपार्कसारखे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात येत होते, आले होते ते तुमच्या डोळ्यांसमोरून गुजरातला घेऊन गेले. त्यामुळे दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा, असा उपरोधिक टोला संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.


संगळ्या यंत्रणा सरकारच्या हातात आहेत. आता न्याय व्यवस्थेवरच हातोडा घालायचं काम बाकी आहे, त्याचंही काम सुरू आहे, असंही संजय राऊत म्हणाले. इक्बाल सिंह चहल यांच्यामागेही ईडीचा ससेमीरा मागे लावल्याने संजय राऊतांनी यावेळी संताप व्यक्त केला.

- Advertisement -

पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला डाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार आहेत. यावरून संजय राऊतांनी मोदींवरही टीकास्त्र डागलं. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात अनेक प्रकल्प कार्यान्वित झाली. त्याच प्रकल्पासाठी हे सरकार पंतप्रधानांना बोलावून श्रेय घ्यायचं काम करतंय. यामुळे पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला डाग लावण्याचा प्रयत्न आहे. ज्या प्रकल्पांच्या योजना आम्ही केल्या, प्रधानमंत्र्यांच्या प्रतिष्ठेबाबत महत्त्व वाटत नसेल तर त्यांना करू द्या.

बोलणं सुरू आहे

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यासंदर्भात आम्ही दुपारी बैठक घेणार आहोत.नाशिक मतदारसंघात कोणता निर्णय घ्यावा व नागपूरसाठी काय निर्णय घ्यावा याबाबत भूमिका स्पष्ट करू. याबाबत थोड्यावेळापूर्वी माझे शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशीमध्ये देखील चर्चा झालेली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये कोणता निर्णय घ्यावा, नागपूरबाबत आज ठरेल. दूरध्वनीवर पवारांसोबत बोलणं झालं आहे. ठाकरेंशीही चर्चा झाली आहे. एकमेकांशी संवाद सुरू आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -