घरमहाराष्ट्रकिती नेत्यांकडून विरोध होतो हेच बघायचंय..., भाजपाच्या 'त्या' निर्णयावरून रोहित पवारांचा निशाणा

किती नेत्यांकडून विरोध होतो हेच बघायचंय…, भाजपाच्या ‘त्या’ निर्णयावरून रोहित पवारांचा निशाणा

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्या निखिल भामरे याची भाजपeच्या मीडिया सेलच्या सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या किती नेत्यांकडून या कृतीला विरोध होतो, हेच आता बघायचंय, असे ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

नाशिकला राहणारा 22 वर्षीय निखिल भामरे हा फार्मसीचा विद्यार्थी असून त्याने गेल्या वर्षी शरद पवार यांचे प्रत्यक्ष नाव न घेता ट्वीट केले होते. वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची, असे ट्वीट करत, ‘बाराचा काका माफी माग’ असा हॅशटॅग त्याने दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर 13 मे 2022 रोजी त्याला नाशिक येथून अटक करण्यात आली. महिनाभरानंतर त्याची जामीनावर सुटका झाली. सुटका झाल्यानंतर त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले होते.

- Advertisement -

बुधवार, 2 ऑगस्ट रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये संयोजकपदी प्रकाश गाडे यांची तर, सहसंयोजकपदी सागर फुंडकर, लक्कीसिंग चावला, चंद्रभूषण जोशी, पीयूष कश्यप आणि निखिल भामरे यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु आता भामरे याच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला आहे.

- Advertisement -

सोशल मीडियात शरद पवार पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरे याची भाजपाकडून सोशल मीडियाचा सहसंयोजक म्हणून नेमणूक केली जाते, म्हणजेच समाजात विकृतीला खतपाणी घालण्याचे काम भाजपाच करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. समाजात विष कालवणाऱ्या या विकृत कृतीचा तीव्र निषेध, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहेत. तसेच, भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या किती नेत्यांकडून या कृतीला विरोध होतो, हेच आता बघायचे आहे, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -