घरमहाराष्ट्रधक्कादायक: पपई वाहतूक करणारा ट्रक पलटला, १६ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

धक्कादायक: पपई वाहतूक करणारा ट्रक पलटला, १६ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

कामगार मजुरांवर काळाचा घाला

जळगावमध्ये पपईची वाहतूक करणारी गाडी उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १६ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रविवारी रात्री १२ च्या सुमारास जळगाव-कीनगावनजीक मनूदेवी मंदिराच्या परिसरात भीषण अपघात झाला आहे. अपघातात ५ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पपईची वाहतूक करणारा ट्रक होता. अचानक ट्रक पलटल्याने हा अपघात झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी आभोडा येथील १२, केऱ्हाळा येथील २ तर रावेर येथील दोघांचा समावेश आहे. जखमींपैकी २ जण गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळते आहे. यावल तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. दरम्यान १६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.

काय आहे घटना

यावल तालुक्यातील किनगावजवळ पपई वाहतूक करणारा ट्रक पलटल्याने मोठा अपघात झाला. या ट्रकमध्ये काही महिला मजूर आणि लहान मुलेही प्रवास करत होते. ट्रक उलटल्याने १६ मजूरांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये काही मजूर आणि लहान मुले, महिलांचा समावेश आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर जखमींना जवळील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत. अपघाती ट्रकला क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आले आहे. हा ट्रक पपई घेऊन रावेरच्या दिशेने निघाला होता. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

जळगाव अपघाताप्रती मोदींनी व्यक्त केले दु:ख

जळगावमध्ये पपई वाहतूक ट्रक उलटून १६ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील जळगाव येथे ट्रकचा भीषण अपघात झाला. शोकाकुल कुटुंबांना सहानुभूती जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना मोदींनी केली आहे

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -