घरमहाराष्ट्रजय जय महाराष्ट्र गीताची वेळ केली कमी, काय आहे नेमकं कारण?

जय जय महाराष्ट्र गीताची वेळ केली कमी, काय आहे नेमकं कारण?

Subscribe

जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कवी राजा बढे यांनी लिहिले आहे. श्रीनिवास खळे यांनी हे गाण संगीतबद्ध केल आहे. कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्यावेळी मुंबईतील दादर येथे शिवाजी पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे गायले होते.

मुंबईः जय जय महाराष्ट्र गीत मोठं होत असल्याने या गीताचं दुसरं आणि तिसरं कडवचं गायलं जाणार आहे. एकूण १ मिनिटे ४५ सेकंद हे गीत गायले जाणार आहे. या गीताचा बोर्डही मंत्रालयासमोर लावला जाणार आहे.

जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कवी राजा बढे यांनी लिहिले आहे. श्रीनिवास खळे यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्यावेळी दादर येथे शिवाजी पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे गायले होते.

- Advertisement -

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक गीत असावे, असा ठराव करण्यात आला होता. त्यासाठी महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड झाली. राष्ट्रगीतानंतर आता राज्यात हे गीत गायले जाणार आहे.

जय जय महाराष्ट्र गाण्याला महाराष्ट्र गीताचा दर्जा मिळणार असल्याचे संकेत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षीच दिले होते. सद्यस्थितीत देशातील केवळ ११ राज्यांचेच स्वत:चे असे गाणे आहे. यात आता महाराष्ट्र राज्याचेही स्वत:चे गीत असेल. महाराष्ट्राचे अधिकृत राज्य गीत म्हणून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला महाराष्ट्र गीताचा दर्जा मिळेल, असेही मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले होते.

- Advertisement -

जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत १.१५ ते १.३० मिनिटांमध्ये बसेल असे या गाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान भारताच्या राष्ट्रगीताची वेळ देखील ५२ सेकंद आहे. या गाण्यातील मूळ शब्द बदलले जाणार नाहीत. कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे गाणे गायले जाईल असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते. त्यानुसार आता या गीताचं दुसरं आणि तिसरं कडवचं गायले जाणार असल्याचे राज्य शासानाने स्पष्ट केले आहे. नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत जय जय महाराष्ट्र गीताचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान या गीतामधील तिसरं कडवं वगळले असल्याची चर्चा होती. या कडव्यात दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असा उल्लेख आहे. दिल्लीतील गुज्जू नेत्यांना ते आवडणार नाही, असे ट्विट adv असिम सरोदे यांनी केले होते. तसेच दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे कडवं वगळलेले राज ठाकरे यांनाही आवडणार नाही. त्यामुळे मनसे शिंदे-फडणवीस सरकारविरोधात लवकरच आंदोलन करेल,असे ट्विट विश्वंभर चौधरी यांनी केले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -