घरताज्या घडामोडीसत्ताधारी पक्षानं सभागृहाची रया घालवली.., निलंबनानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

सत्ताधारी पक्षानं सभागृहाची रया घालवली.., निलंबनानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर आता नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सुरु असेपर्यंत जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु निलंबनानंतर जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, माझा माईक चालू नव्हता. मी भाषण करत नव्हतो. अनेक आमदार समोर उभे होते. सगळ्यांचा आवाज येत होता. अशावेळी आमच्या लोकांना म्हणजे आमचे नेते भास्कर जाधव यांना बोलू दिले जात नव्हते. खरं तर या गोष्टी सरकारनं लक्षात घ्यायला हव्यात, असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

यंदाच्या अधिवेशनात सत्ताधारी पक्षच आंदोलन करताना दिसतो आहे. तेच घोषणा देतात आणि सभागृहात जातात. सत्ताधारी पक्षानं सभागृहाची रया घालवली आहे. आता तीनही पक्षांनी मिळून भूमिका घेण्याची वेळ आली आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

नेमकं घडलं तरी काय?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना विधानसभेत बोलू देण्याची मागणी केली. मात्र ही मागणी अध्यक्षांनी फेटाळून लावली आहे. यावर विरोधी पक्ष नेता म्हणून अजित पवार तुम्हाला संधी दिली होती, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. त्यानंतर विरोधीपक्ष नेते आक्रमक झाल्याचे दिसले, सत्ताधारी बाकावरून 14 जणांना बोलण्याची संधी दिली तर विरोधी बाकावरून एका सदस्स्याला बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी य़ावेळी करण्यात आली.

मात्र विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील चांगलेच संतापल्याचे दिसले. यावेळी रागाच्या भरात तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका, असं जयंत पाटील यांनी म्हटले. जयंत पाटलांच्या या वक्तव्यानंतर आता सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून जयंत पाटील यांना एका वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना आता अधिवेशन सुरु असेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.


हेही वाचा : डरपोक सरकारच्या दडपशाहीचा निषेध, जयंत पाटलांच्या निलंबनानंतर सुप्रिया सुळेंची


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -