घरताज्या घडामोडीवाझेच्या पत्रातील आरोप खोटे, जनता दूधखुळी नाही, जयंत पाटील यांचा भाजपवर पलटवार

वाझेच्या पत्रातील आरोप खोटे, जनता दूधखुळी नाही, जयंत पाटील यांचा भाजपवर पलटवार

Subscribe

महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत तुमच्या कार्यकारिणीत चर्चा करा

सचिन वाझे वसुली प्रकरणात आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री अनिल परब यांचेही नाव घेण्यात आले आहे. बदल्यांमधील भ्रष्टाचार वारंवार समोर येत असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली आहे. यावर भाजपच्या कार्यकारिणीमध्ये काही कामं उरलं नसल्यामुळे बेछूट आरोप करण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. वाझेच्या पत्रातील आरोप खोटे आहेत केवळ दबावाखाली असं पत्र लिहून घेतलं असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. एका अटक झालेल्या अधिकाऱ्याने किंवा आरोप असलेल्या अधिकाऱ्याने पत्र लिहायचं आणि वाटेल तसे बेछूट आरोप करायचे आणि जिलेटीनच्या कांड्या ठेवण्याच्या अतिशय गंभीर आरोपात अडकलेले जे अधिकारी आहेत. त्यांच्या म्हणण्यावर आधारित आसा जर भाजप ठराव करत असेल तर भाजपवर वैचारिक दिवाळखोरी आलेली आहे. कारण ज्यांच्यावर गंभीर आरोप आहे. ज्यांच्यावर केंद्र सरकार एनआयए तपास करत आहेत. त्याच्यापासून येणारी पत्र आहेत. महाराष्ट्राची जनता दूधखुळी नाही. ती पत्र दबावाखाली लिहून घेतली आहेत अशी आमची खात्री आहे. काहीच हातात सापडत नाही यासाठी संशयाचं भूत निर्माण करण्यासाठी भाजप खालच्या पातळीवर उतरला आहे की, आता अजित पवार आणि अनिल परब यांची चौकशी करण्याचा ठराव कार्यकारिणीत चर्चा करण्यात आली आहे.

- Advertisement -

भाजपच्या कार्यकारिणीला कामंच नाही

महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत तुमच्या कार्यकारिणीत चर्चा करा. तुमच्या काही अधिकाऱ्यांनी खोट्या आरोपांबाबत सीबीआयनं चौकशी करा अशी चर्चा होत असेल तर कार्यकारिणीला दुसऱ्या कोणती काम उरली नाहीत असा वाटत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -