फडणवीसांना नाही तर चंद्रकांत पाटलांनाच मुख्यमंत्रीपदाची घाई, जयंत पाटलांचा खोचक टोला

jayant patil slams chandrakant patil over chief minister dream statement
फडणवीसांना नाही तर चंद्रकांत पाटलांनाच मुख्यमंत्रीपदाची घाई, जयंत पाटलांचा खोचक टोला

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असून ते विकासकामांचे उद्घाटन करत आहेत. या कार्यक्रमादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरुन वक्तव्य केलं आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्री लवकरात लवकर व्हावं यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे पाटील म्हणाले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकात पाटील यांनाच जास्त घाई असल्याचे म्हटलं आहे. पाटील यांना तिथे बसायचे आहे पण त्यांचे नाव यादीत नाही असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

पुणे महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते ज्यांनी लवकर मुख्यमंत्री व्हावे असे आपण स्वप्न पाहतो आहोत. हे स्वप्न आपण सगळेच जागेपणी पाहत आहोत. तसेच त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. यासाठी लोकांचे आशीर्वाद देखील मिळवतो आहोत कारण फडणवीसांनी लवकर मुख्यमंत्री व्हावे असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याची कोणतीही घाई नाही परंतु चंद्रकांत पाटील यांना जास्त घाई आहे. फडणवीस यांचे नाव पुढे करुन ते बोलतात मात्र त्यांना तिथे बसायचे आहे. अस त्यांना वाटत असेल तरी त्यांचे नाव मात्र यादीत नाही असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

फडणवीसांसारख्या संमजस व्यक्तीने अनादर दाखवणं अयोग्य

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील मराठी साहित्य संमेलनाला अनुपस्थिती लावली आहे. भाजपच्या सर्वच नेते साहित्य संमेलनात अनुपस्थित आहेत. यावर जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, नाशिक कुसुमाग्रजांची भूमी आहे. थोर सोहित्यिकांची भूमी आहे. त्यांच्याबाबत अनादर दाखवत असतील तर परंतु त्यांच्यासारख्या संमजस व्यक्तीने अनादर दाखवणं योग्य नाही असे जयंत पाटील म्हणाले. दरम्यान आमच्या आदर्शांना अपमानित करण्यात येत तिथ जाण्यामध्ये अर्थ नाही असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.


हेही वाचा :  ज्यांना यायचं ते येतील, आम्ही आमचं काम केलंय; भुजबळांचा फडणवीसांना टोला