घरताज्या घडामोडीजाता जाता बोम्मईंच्या ट्वीटचा निकाल द्या, जयंत पाटलांचे एलन मस्कला साकडे

जाता जाता बोम्मईंच्या ट्वीटचा निकाल द्या, जयंत पाटलांचे एलन मस्कला साकडे

Subscribe

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावरुन महाविकास आघाडी आणि सत्ताधारी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. परंतु हे फेक ट्विट असल्याचं बोम्मई यांनी म्हटल्यानंतर विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक ट्वीट केलंय. तसेच त्यांनी थेट ट्विटरचे मालक एलन मस्क यांनाच साकडे घातले आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगत आहेत. त्यामुळे एलन मस्क यांनीच आता सांगावं की हे ट्विट नक्की कोणी केलं, असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

मी ट्वीटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न एलन मस्कने ट्वीटर पोलच्या आधारे विचारला आहे. त्याच पोलला रिट्वीट करत जयंत पाटलांनी मस्कला एक प्रश्न विचारला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्वीट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. त्यामुळे एलन मस्क यांनी आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे?, असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

विधानसभेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी बोम्मईंच्या ट्विटवर सवाल विचारला. बोम्मईंच्या नावाने खोटं ट्वीट कोणी केलं?, खोटं ट्वीट करण्यामागे कोणता पक्ष आहे ते कळलंय, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात दिली. हे ट्विट्स आपण केली नसल्याचं बोम्मईंनी दिल्लीच्या बैठकीत सांगितलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, या ट्वीटला एलन मस्क खरंच उत्तर देतोय का?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : आगामी लोकसभेसाठी भाजपाचे लक्ष्य 51 टक्के मते; संघटना बळकट करण्याचे आवाहन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -