घरताज्या घडामोडीनांदेडच्या सुपुत्राचा सन्मान, झारखंडचे ADG संजय लाठकरांना राष्ट्रपती पदक जाहीर

नांदेडच्या सुपुत्राचा सन्मान, झारखंडचे ADG संजय लाठकरांना राष्ट्रपती पदक जाहीर

Subscribe

राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून त्यांना महात्मा गांधी शांतता पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडून दोन वेळा सन्मान पत्र देण्यात आले आहे.

नांदेडच्या सुपुत्राचा सन्मान करण्यात येणार आहे. झारखंडचे अपर पोलीस महासंचालक संजय लाठकरांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. लाठकर भारतीय पोलीस सेवेतील १९९५ बॅचचे झारखंड राज्यात कार्यरत आहेत. त्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त झारखंडचे अपर पोलीस महासंचालक संजय आनंदराव लाठकर यांना उल्लेखनीय कामगिरी आणि सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे. हा बहुमान प्रतिष्ठित मानला जातो आणि देशातील निवडक पोलीस अधिकाऱ्यांनाच दिला जातो.

झारखंडचे अपर पोलीस महासंचालक संजय लाठकर २६ वर्षे सेवा बजावली आहे. देशातील बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि सीआरपीएफमध्ये सेवा बजावली आहे. यापूर्वी देखील त्यांना चांगल्या कामगिरीबद्दल वेगवेगळ्या ८ पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पदकांमध्ये लाठकर यांना राष्ट्रपतींकडून पोलीस शौर्य पदक, आंतरिक सुरक्षा पदक दोन वेळा, मुख्यमंत्री झारखंड यांचे शौर्य पदक, राष्ट्रपतींकडून घोषित गुणवत्तापूर्ण आंतरिक सुरक्षा पद, झारखंड मुख्यमंत्री यांचे शौर्य पदक, केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisement -

झारखंडचे अपर पोलीस महासंचालक संजय लाठकर यांना चांगल्या कामागिरीमुळे बिहार आणि झारखंड सरकारकडून अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. गडचिरोली, नागपूर आणि रांचीमध्ये नक्षलविरोधी मोहिमेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी सीआरपीएफ प्रशंसा डिस्कने पुरस्कृत करण्यात आले आहे. पोलीस सेवेतील चांगल्या कामगिरीमुळे लाठकरांना ६० पेक्षा अधिक प्रशिस्तिपत्र देण्यात आली आहेत.

अपर पोलीस महासंचालक संजय लाठकर यांनी महाराष्ट्रात परभणी आणि लातूर जिल्ह्यात पोलीस अधिक्षक म्हणून कामकाज पाहिले आहे. पुणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त व दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी अशा पदांवर कामकाज पाहिले आहे. राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून त्यांना महात्मा गांधी शांतता पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडून दोन वेळा सन्मान पत्र देण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील ५१ पोलिसांचा गौरव, ७ जणांना शौर्य; तर चौघांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -