घरट्रेंडिंगVideo: आव्हाडांची मोदींवर 'विंडबनात्मक' कविता

Video: आव्हाडांची मोदींवर ‘विंडबनात्मक’ कविता

Subscribe

मागील काही दिवसांपासून राफेल घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या राफेलच्या मुद्यावरून विरोधकांनी भाजपला आणि मोदींना जेरीस आणले आहे. नुकतेच भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मोदींची तुलना विष्णूशी केली होती. यामुळे विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे. याच धर्तीवर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही विडंबनात्मक आरतीच्या माध्यमातून मोदींवर जोरदार टीका केली. आव्हाड यांच्या या कवितेमुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. आव्हाड यांनी फेसबुकवर याविषयी एक सविस्तर पोस्ट शेअर केली अाहे, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींना संबोधण्यात आलेल्या विष्णूच्या अकराव्या अवताराविषयी भाष्य केलं आहे. तसंच त्यांनी रचलेली ही खास विंडबनात्मक कविताही सादर केली आहे.

आव्हाडांची विडंबनात्मक कविता

येइयो अंबानी माझे माउली ये
अकरावा अवतार राफेलवर स्वार होसी
अंबानिला घेऊन तो फ्रान्सला जासी
डसाल्ट कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देसी
दोघे मिळूनी भारत देश विकाया नेसी ”

फेसबुकवर काय म्हणाले आव्हाड…

‘आज फेसबुक बघत असताना अचानक विमानावर स्वार मोदींचा विष्णू अवतारातील फोटो पहिला.
कल्की अवतारानंतर भगवान विष्णू मोदींच्या रूपात अवतरल्याचा साक्षात्कार काल भाजपच्या एका प्रवक्त्यांना झाला. आता देव आहेच म्हटल्यानंतर वाहन, मंदीर, आरती हे सोपस्कार आलेच. याबद्दलच विचार करत असताना या नव्या देवाची आरती रचण्याचा हा छोटासा प्रयत्न केल्याची त्यांनी फेसबुक पोस्ट टाकली आहे.’

- Advertisement -

काय होते अवधूत वाघ यांचे वक्तव्य

‘आपल्या हिंदू संस्कृतीत ३३ कोटी देव आहेत, पंचमहाभुतं आहेत, भारतमातेला आपण देव मानतो. अगदी त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानसेवक असून, ते भारतमातेची सेवा ज्याप्रकारे करत आहेत त्यामुळे आमच्यासाठी ते देवासमानच आहेत.’


Video: बाळाला पाठीवर बांधून ‘तिने’ दिल्या बातम्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -