राष्ट्रपती भवनात राजीनामा पाठवून द्या आणि थेट गाव गाठा, कोश्यारींविरोधात आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

former minister ncp leader jitendra awad emotional post on her life maharashtra politics

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. परंतु कोश्यारींनी राज्यपाल पदावरून आणि जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ जारी करत राष्ट्रपती भवनात राजीनामा पाठवून द्या आणि थेट गाव गाठा असं वक्तव्य करत कोश्यारींविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपलं डोकं वापरुन राजीनामा, पदमुक्त होण्याचं ठरवलं आहे. अहो वाट कसली बघताय?, राष्ट्रपती भवनात राजीनामा पाठवून द्या म्हणजे आपोआप राजीनामा स्विकारला जाईल. त्यानंतर पटकन विमान पकडा आणि आपल्या गावी निघून जा. तुमच्या बॅगा महाराष्ट्र, मंत्रालय किंवा राज्यपाल भवनातले कर्मचारी पॅक करून पाठवून देतील, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जनभावना तुमच्या विरोधात इतकी आहे की, लोकांच्या मनात महाराष्ट्र निर्मितीच्या साठ-सत्तर वर्षात एवढा राग कोणाबद्दल लोकांच्या मनात असेल असं मला वाटत नाही, इतक्या शिव्या कुठल्याही राज्यपालांनी खाल्ल्या नसतील इतक्या शिव्या तुम्ही खाल्ल्या आहेत. तेव्हा यातच शाहनपणा आहे की, आपली इज्जत प्रिय असेल तर गप निघून जा. तुम्ही जावं ही महाराष्ट्राची इच्छा आहे, असंही आव्हाड म्हणाले.


हेही वाचा : राज्यपालांना परतीचे वेध; गुजरात निवडणुकीनंतर कोश्यारींच्या पाठवणीची शक्यता