घरताज्या घडामोडीआता व्हाया नाशिक करा काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास, गडकरींची मोठी घोषणा

आता व्हाया नाशिक करा काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास, गडकरींची मोठी घोषणा

Subscribe

कश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कश्मीर ते कन्याकुमारी प्रवास महाराष्ट्रातील सोलापूर त्यानंतर कन्नूर, त्रिवेंद्रम, हैदराबाद, बंगलोर, कन्याकुमारी असा होत होता. परंतु, आता नाशिकवरुन कन्याकुमारी प्रवास करता येणार आहे.

कश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कश्मीर ते कन्याकुमारी प्रवास महाराष्ट्रातील सोलापूर त्यानंतर कन्नूर, त्रिवेंद्रम, हैदराबाद, बंगलोर, कन्याकुमारी असा होत होता. परंतु, आता नाशिकवरुन कन्याकुमारी प्रवास करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कश्मीर ते कन्याकुमारी प्रवासासाठी मुंबई पुण्याला किंवा सोलापूरला जावे लागणार नाही. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली. (journey from kashmir to kanyakumari will be via nashik says union minister nitin gadkari)

नाशिकवरुन कन्याकुमारी प्रवास करता येणार आहे. त्यामुळे थेट नॉर्थचे साऊथशी कनेक्शन नाशिकवरुन होणार आहे. त्यामुळे लवकरच काश्मीर आणि कन्याकुमारी या नेटवर्कला नाशिक जिल्हा जोडला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नितीन गडकरी हे आज नाशिक दौऱ्यावर असून नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्यावतीने ऑल व्हील डिस्प्ले संकल्पनेतून नाशिक शहरात पहिल्यांदाच ऑटो अँड लॉजिस्टिक एक्स्पोचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

“लवकरच काश्मीर आणि कन्याकुमारी या नेटवर्कला नाशिक जिल्हा जोडला जाणार आहे. सद्यस्थितीत डिझेल हे प्रदूषणकारी आणि न परवडणारे इंधन आहे. इलेक्ट्रिक ट्रक फारच स्वस्त आहे. जिथे 100 रुपये डिझेल लागते, तिथे 10 रुपये इलेक्ट्रिक लागेल. त्यामुळे येणाऱ्या काळात आपली लॉजिस्टिक कॉस्ट असणार जगात सर्वात जास्त म्हणजेच 16 टक्के असणार आहे. यानंतर सर्व ट्रक एलएनजी आणि सीएनजी, इथेनॉल आणि बायोगॅसवर चालणार आहे”, असे मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

“वाहतुकीमध्ये परिवर्तन होत आहे. डिझेल ट्रक फार काही परवडत नाही. येणाऱ्या काळात ट्रान्सपोर्ट असोसिएशनने शहराच्या बाहेर ट्रक थांबवण्यासाठी जागा तयार करावी. ज्यामुळे ट्रॅफिक होणार नाही. नाशिकमधील द्वारका येथे डबल डेकर ब्रिज होईल. लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून नाशिकला बनवण्यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पुढाकार घ्यावा. यासाठी नाशिक महापालिकेला याबाबत प्रस्ताव द्यावा म्हणेजच बाहेरच्या बाहेर ट्रक थांबतील आणि वाहतूक कोंडी होणार नाही, आमचा विभाग त्यासाठी प्रयत्न करेल”, असेही नितीन गडकरी म्हणाले.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नाशिकच्या ईदगाह मैदानावर आयोजित ‘नो युअर आर्मी’ (Know Your Army) या भारतीय संरक्षण दलाची ताकद दाखवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गडकरींसमवेत मंचावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खनिकर्म मंत्री दादा भुसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


हेही वाचा – G-20 : नागपूरचा चांगला अहवाल जगभरात जाणार; देवेंद्र फडणवीसांची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -