Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र खरेंचे खोटे कारनामे : खरेच्या घरात आढळलेली रक्कम व्यापारी बँकेच्या देवाणघेवाणीतून ?

खरेंचे खोटे कारनामे : खरेच्या घरात आढळलेली रक्कम व्यापारी बँकेच्या देवाणघेवाणीतून ?

Subscribe

नाशिक : तात्कालीन जिल्हा उपनिबंधक सतीश खरेला ३० लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यानंतर त्याच्या घरझडतीत पथकाला १५ लाख ८६ हजार रोख आणि ३३ लाख मूल्याचे ५४ तोळे सोने आढळून आले. यातील रोख रक्कम ही नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेची निवडणूक मॅनेज करुन जमा केलेली असू शकते, असा संशय बँकेचे उमेदवार हेमंत गायकवाड यांनी व्यक्त केला. यासंदर्भात त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षकांना पत्र दिले.

या पत्रात म्हटले आहे की, सतीश खरे विरोधात अनेक तक्रारी असतानादेखील त्याची नाशिकरोड – देवळाली व्यापारी बँकेच्या निवडणुकीसाठी सहकार निवडणूक प्राधिकरण सहआयुक्त जगदीश पाटील आणि सहकारी संस्थांचे उपनिबंधक अरविंद कटके यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण करून त्यांची नेमणूक केली होती. त्यांची नेमणूक करू नये, असे आम्ही कळवले होते. तरीदेखील निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. विद्यमान संचालक मंडळाने वरील अधिकार्‍यांना आर्थिक देवाण घेवाण करून त्यांची नेमणूक केली होती. सतीश खरे याच्या घरात सापडलेली रोख रक्कम कदाचित यासंदर्भातील असू शकते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी.

खरेचा हस्तक काकड?
- Advertisement -

सतीश खरेचे देवाण-घेवाण व्यवहार जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील काकड नावाचा कर्मचारी करत असल्याचे हेमंत गायकवाड यांनी पत्रात म्हटले आहे. नाशिकरोड – देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या चौकशीसंदर्भात आणि इतर कामात काकड याने सतीश खरे साठी पैसे घेतल्याचे समजते. काकड हेच सतीश खरेचा हस्तक असून त्याच्याही संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काकड याच्याकडेही बेहिशोबी मालमत्ता सापडू शकेल, असेही पत्रात म्हटले आहे.

खरेच्या नियुक्तीमागे षड्यंत्र

परिवर्तन पॅनलचे नेते हेमंत गायकवाड, अशोक सातभाई आदींनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, ५ वर्षात संचालक मंडळाने भ्रष्टाचार केला. संचालक मंडळाने पोटनियम ४० चा वापर केला. या निर्णयाला स्थगिती मिळविल्याने इच्छुकांना ही निवडणूक लढविता येणार आहे. लाचखोरीच्या कारवाईत सापडलेले उपनिबंधक खरे हे निवडणूक निर्णय अधिकारी नको, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करुनही खरेंची नियुक्ती झाली. यामागे मोठे षड्यंत्र असल्याचा आरोपही करण्यात आला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -