घरनवी मुंबई...या चुका टाळल्या असत्या तर कदाचित १४ श्रीसेवकांचे जीव वाचले असते

…या चुका टाळल्या असत्या तर कदाचित १४ श्रीसेवकांचे जीव वाचले असते

Subscribe

कार्यक्रमाच्या वेळेपासून ते श्रीसेवकांची गैरसोय अशी सर्वच गणितं चुकत गेली.

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. खारघरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, भर दुपारी हा कार्यक्रम झाल्यामुळे उपस्थित श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यात १२ श्रीसदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. या मृत्यूप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून उष्मालाटेसंदर्भात काही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, एकूण परिस्थिती पाहता या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन प्रशासनाने खारघरमध्ये कार्यक्रम घेतला. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या सूचनांचे पालन झाले असते तर कदाचित १४ श्रीसेवकांचे जीव वाचण्याची शक्यता होती.

नवी मुंबई-खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करताना, राज्य सरकारने २९ मार्चला जाहीर केलेल्या उष्मालाट कृती आराखडय़ाकडे आयोजक असलेल्या शासकीय यंत्रणांचेच दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. उष्मालाटेचा विचार करून, दुपारी २ ते ४ या दरम्यान मोर्चे, निदर्शने, अशा गर्दी होणाऱ्या कार्यक्रमाला परवानागी द्यायची की नाही, त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृती आराखडय़ात देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

या वर्षी देशातच २ अंश सेल्सियसने उष्णाता जास्त वाढणार आहे, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी २ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी सर्व राज्यांच्या आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता व स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारने उष्णतेची लाट कृती आराखडा २०२२-२३ जाहीर केला आहे. १ मार्च ते १५ जून या कालावधीसाठी हा आराखडा असून, उष्मालाटेमुळे होणाऱ्या परिणामाचा मुकाबला करण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना काय काय करायच्या याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचनांचा समावेश त्यात करण्यात आला आहे.

१ मार्च ते १५ जून या कालावधीसाठी तयार करण्यात आलेल्या या आराखड्यात उष्मालाटेमुळे होणाऱ्या परिणामाचा मुकाबला करण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना काय काय करायच्या याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचनांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या सहीने हा कृती आराखडा प्रसिद्ध झाला होता. राज्यातील उष्णतेची लाट पाहता या कृती आराखड्याची गांभीर्याने अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. परंतु, खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण सोहळा आयोजित करताना उष्मालाटेविषयी विचार करण्यात आला होता का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या वेळेपासून ते श्रीसेवकांची गैरसोय अशी सर्वच गणितं चुकत गेली. ज्यादिवशी खारघरमध्ये हा कार्यक्रम पार पडला तेव्हा नवी मुंबईमध्ये ३७ अंश सेल्सिअस तापमान होते. हवेत आर्द्रताही अधिक होती. लाखोंचा जनसागर एकत्र आल्याने उष्णता आणि आर्द्रता वाढली. कार्यक्रम वेळेत सुरु न झाल्यामुळे पुढे तो लांबला. यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांना म्हणजेच श्री सेवकांना तब्बल पाच तास रणरणत्या उन्हात बसावे लागले. त्यामुळेच श्रीसेवक उष्माघाताला बळी पडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -