घरताज्या घडामोडीकिरीट सोमय्या चौकशीसाठी गैरहजर, वकिलांकडून वाढीव वेळ देण्याची पोलिसांकडे मागणी

किरीट सोमय्या चौकशीसाठी गैरहजर, वकिलांकडून वाढीव वेळ देण्याची पोलिसांकडे मागणी

Subscribe

आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैशांचा अपहार केला असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे. सोमय्यांवरील आरोपानंतर माजी सैनिकाने मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सोमय्यांना या फसवणुकीच्या गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून समन्स जारी करण्यात आले होते. शनिवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सोमय्यांना देण्यात आले होते. सोमय्या पिता-पुत्रांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते परंतु पूर्वनियोजीत कार्यक्रमांमुळे ते हजर राहू शकले नाही अशी माहिती त्यांचे वकील ह्रषिकेश मुंदारगी यांनी दिली आहे. वकिलांनी पोलिसांना निवेदन दिले असून चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी विनंती केली आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आयएनएस विक्रांत प्रकरणी चौकशीला गैरहजर राहिले आहेत. त्यांचे वकील निवेदन देण्यासाठी ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे की, किरीट सोमय्यांना काल ४१ ए ची नोटीस पाठवण्यात आली होती. त्या नोटीसप्रमाणे ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगितले होते. परंतु काही पूर्वनियोजीत कार्यक्रमांसाठी किरीट सोमय्या गुरुवारपासून दिल्लीत आहेत. नोटीस काल मिळाली आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी दिल्लीत असल्यामुळे ते चौकशीला उपस्थित राहू शकत नाहीत. यामुळे ते उपस्थित राहू शकणार नाहीत असे निवेदन पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे.

- Advertisement -

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, किरीट सोमय्या दिल्लीत आहेत. आज ते येऊ शकत नाही. यामुळे बुधवार १३ एप्रिलनंतर कोणत्याही दिवशी आम्हाला वेळ द्या, अशी मागणी केली असल्याचे वकिलांनी सांगितले.

नोटीस काल मिळाली आहे. या एफआयआरची कॉपीसुद्धा आज देण्यात आली आहे. एखाद्या आरोपीला एफआयआर कॉपी द्यायची असते. परंतु किरीट सोमय्या यांनी ७ तारखेला पोलिसांना पत्र देऊन एफआयआरची कॉपी देण्याची मागणी केली होती. कारण एफआयआर वाचल्यानंतर काय आरोप आहेत हे कळते. परंतु आज कॉपी देण्यात आली आहे. ४१ ए नोटीस कायद्याप्रमाणे काल दुपारी ३ वाजता देण्यात आली आहे. त्यापूर्वीच किरीट सोमय्यांचे पूर्वनियोजीत कार्यक्रम असून ते दिल्लीला आहेत.

- Advertisement -

नील सोमय्या हे नगरसेवक आहेत त्यांचेही काही कार्यक्रम ठरलेले होते. त्यामुळे ते उपस्थित राहू शकत नाही. दोघांच्या वतीने सीनियर पीआय यांना भेटून विनंती केली आहे. किरीट सोमय्या दिल्लीत असल्यामुळे ते चौकशीला हजर राहू शकत नाहीत. १३ एप्रिलनंतर कोणत्याही तारखेला किरीट सोमय्या चौकशीला हजर राहतील असे सोमय्यांचे वकील म्हणाले.


हेही वाचा : शरद पवारांचा सातारा दौरा रद्द, महाराष्ट्र केसरी स्पर्धा स्थगित करण्याचा आयोजकांचा निर्णय

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -