घरमहाराष्ट्रअज्ञातवासात असलेल्या सोमय्यांनी व्हिडिओ शेअर करत ठाकरे सरकारला दिला पुन्हा इशारा

अज्ञातवासात असलेल्या सोमय्यांनी व्हिडिओ शेअर करत ठाकरे सरकारला दिला पुन्हा इशारा

Subscribe

आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे अज्ञातवासात आहेत. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी तर त्यांना फरार घोषित केलं आहे. अशात आता किरीट सोमय्या यांनी त्यांचा व्हिडिओ ट्विटरवर शे्र केला असून त्यांनी ठाकरे सरकारला पुन्हा इशारा दिला आहे.

२०१३ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने विक्रांत युद्धनौकाला ६० कोटीत भंगारवाल्याला विकण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याचा निषेध केला. भाजपने १० डिसेंबरला चर्चगेट स्टेशनवर एक तासाभराचा सांकेतिक, प्रतिकात्मक निधी संकलनाचा कार्यक्रम घेतला. सुमारे ११ हजार रुपये जमले. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेचे खासदार, मी स्वत: १७ डिसेंबर २०१३ ला राष्ट्रपतींना भेटलो. त्यांना ही माहिती दिली. राज्यपालांना सांगितलं. आज १० वर्षानंतर संजय राऊत सांगतात किरीट सोमय्या यांनी ५८ कोटी हडपले. चार बिल्डरांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग करुन नील सोमय्या यांच्या कंपनीत जमा केले. एक कागद नाही, पुरावे नाही. पोलिसांकडे कागद नाहीत. तक्रारदार म्हणतात संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे इथे आलो आहे. संजय राऊत यांनी आधीपण सात आरोप केले आहेत. या घोटाळेबाज सरकारच्या सगळ्या घोटाळेबाजांना त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत किरीट सोमय्या स्वस्त बसणार नाही. आम्ही उच्च न्यायालयात जात आहोत. न्यायालया समोर सगळी माहिती ठेवणार, असं किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

केंद्राला विचारु तुमची सुरक्षा असलेले लोक कुठे आहेत? – गृहमंत्री

दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळई त्यांनी सोमय्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आम्ही केंद्राला विचारु की तुमची सुरक्षा असलेले लोक कुठे आहेत? आरोप करणं सोपं असतं, आरोप करायेच मग स्वत:वर आरोप झाले की मग चौकशीला सामोरे जायचं नाही. हे काही फार शुरपणाचं लक्षण नाही, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – सोमय्या नॉट रिचेबल! केंद्राला विचारु तुमची सुरक्षा असलेले लोक कुठे आहेत? – गृहमंत्री


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -