घरताज्या घडामोडीKirit Somaiya VS Hasan Mushrif: हसन मुश्रीफांचे सोमय्यांनी उघड केलेले दोन घोटाळे...

Kirit Somaiya VS Hasan Mushrif: हसन मुश्रीफांचे सोमय्यांनी उघड केलेले दोन घोटाळे नेमके कोणते? वाचा सविस्तर

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज ९ वाजता पत्रकार परिषद ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा उघड केला. यापूर्वी त्यांनी १२७ कोटींचा घोटाळा उघड केला होता. त्यानंतर सोमय्यांनी आज हसन मुश्रीफ यांनी १०० कोटींचा घोटाळा उघडल केला असून लवकरच तिसरा घोटाळा देखील उघड करणार आहेत. मात्र हसम मुश्रीफांचे दोन घोटाळे नेमके कोणते? ते वाचा.

हसन मुश्रीफ यांचा पहिला घोटाळा

सोमय्यांनी दिलेल्या महितीनुसार, सीआरएम सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड (CRM Systems PVT LTC) या कंपनीत प्रवीण अग्रवाल हे ऑपरेटर करतात. याच कंपनीतून हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचे कर्ज घेतले असल्याचे दाखवले आहे. याच कंपनीवर सन २०१७ -१८ मध्ये प्रतिबंध लावण्यात आला होता. तेव्हा काहींवर कारवाई देखील सुरू झाली होती. याच कंपनीतून नाविद यांनी निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता. सीआरएम कंपनीत २ कोटी ४५ लाख ३५४ इतकी रक्कम असल्याचे नाविद यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवण्यात आले आहे. ही कंपनी शेल कंपनी असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा प्रकारे मुश्रीफ बाप-बेटे दोघांविरोधात १२७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

- Advertisement -

हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा

आजच्या पत्रकार परिषदेत मुश्रीफ म्हणाले की, सर सेनापती घोरपडे साखर कारखान्यात १०० कोटी शेअर्स कॅपिटलपैकी ९८ टक्के म्हणजे ९८ कोटी रुपये हे बोनस कंपन्यांद्वारे भ्रष्टाचाराचा पैसा आणण्यात आला आहे. हसन मुश्रीफ परिवाराचे १० सदस्य आहेत, त्यांच्या नावाने फक्त २ कोटी रुपये असून बाकी सगळा पैसा बोगस कंपन्यांद्वारे आला आहे.

हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा उघड करताना सोमय्या म्हणाले की, मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यांचा संबंध काय? असा सवाल केला. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराने आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला आहे. त्याच्यामध्येही तशाच पद्धतीने कोलकाताच्या शेल कंपन्यांद्वारे म्हणजे ज्या कंपन्या अनेक वर्षांपूर्वी बंद झाल्या आहेत. त्याच्यात बोगस अकाउंट उघडायचं आणि त्या बँक अकाउंटमध्ये मुश्रीफांच्या अजेंटनी कॅश टाकायची. दोन लेअर बनवून स्वतः पैसा घेतला आहे. असे एकूण १०० कोटी रुपयांचे ट्रांजेक्शन आणि गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यांचे कागदपत्र उद्या मुंबई ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे सुपूर्द करणार आहे.

- Advertisement -

‘२०२०मध्ये मागच्या वर्षी कोणत्याही प्रकारचे पारदर्शक निविदा प्रक्रिया न होता हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे देण्यात आला. ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला साखर कारखान चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. परंतु ब्रिक्स इंडियाला का कारखाना दिला हे शरद पवारांना जास्त माहित आहे. कारण की, मतीन हसीन मंगोली म्हणजे हसन मुश्रीफ यांचे जावाई हे ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहेत. या ब्रिक्स इंडियामध्ये ७ हजार १८५ शेअर एसयू कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे आहेत. तर ९९८ मतीन हसीनचे आहेत आणि ९९८ गुलाम हुसेन यांचे आहेत. म्हणजे परत सेनापती कारखान्यासारखा ९८ टक्के शेअर हे एसयू कॉर्पोरेशन या बेनामी शेल कंपनीकडे आहेत. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२०मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो पैसा भ्रष्ट मार्गाने कमावलो तो इथे पास केलायं आणि म्हणून आमची मागणी आहे या घाटोळ्याची चौकशी व्हायला हवी,’ असे किरीट सोमय्या म्हणाले.


हेही वाचा – सोमय्यांची नौटंकी मनोरंजक, फुकटचे मनोरंजन कोण बंद करेल, सचिन सावंत यांचा खोचक टोला


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -