घरताज्या घडामोडीअनिल परबांवरील गुन्हा कोर्टात सिद्ध करणार; किरीट सोमय्यांचं आव्हान

अनिल परबांवरील गुन्हा कोर्टात सिद्ध करणार; किरीट सोमय्यांचं आव्हान

Subscribe

दापोली येथील साई रिसॉर्ट (Sai Resort) प्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशातच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी परबांनी साई रिसॉर्टबाबत माहिती लपवली असून त्यांचा गुन्हा कोर्टात सिद्ध करणार, असं आव्हान किरीट सोमय्यांनी परबांना दिलं आहे. अॅग्रीमेंटमध्ये जर पेमेन्ट झालं नसेल तर छाती ठोकून सांगतो की, रिसॉर्टचे मालक हे अनिल परबच (Anil Parab) आहेत. हे मी कोर्टात सिद्ध करणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

अनिल परबांवरील गुन्हा कोर्टात सिद्ध करणार

किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अनिल परबांनी सदानंद कदमला जमीन विकल्यानंतर त्यांनी यामध्ये दाखवलं आहे की, याचं पेमेन्ट मी केलं आहे. परंतु हे पेमेन्ट झालेलचं नाहीये. त्यामुळे हे अॅग्रीमेंट गृहीत धरलं जाणार नाही. अॅग्रीमेंटमध्ये जर पेमेन्ट झालं नसेल तर छाती ठोकून सांगतो की, रिसॉर्टचे मालक हे अनिल परबच आहेत. हे मी कोर्टात सिद्ध करणार आहे.

- Advertisement -

विभास साठेच्या नावाने फसवणूक

१ मे २०१७ रोजी त्याचं मूल्यांकन शेतजमीन म्हणून करण्यात आलं. विभास साठेच्या नावाने फसवणूक केली तसेच NA करून घेतलं. त्यानंतर १९ जून २०१९ रोजी त्यांनी अॅग्रीमेंट करून घेतलं. ज्यावेळी अग्रीमेंट झालं त्यावेळी ती जमीन बीनशेती झाली होती. हे शेतजमीन असल्याचं अॅग्रीमेंटमध्ये लिहिण्यात आलं आहे. मात्र, त्यावरील सही विभास साठे यांनी केली आहे की अनिल परब यांनी केली आहे. त्यासंदर्भात मी पोलीस आणि आयुक्तांकडे अधिकृत तक्रार केली होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशामुळे पोलिसांनी ती चौकशी दाबली. आता सगळं बाहेर येणार आहे.

विभास साठे यांच्याकडून शेतजमीन म्हणून अनिल परबांनी २ मे २०१७ रोजी जमीन ६० लाखांना घेतली. त्यानंतर तीच जमीन त्यांनी सदानंद कदम यांना विकली, त्यांना ही जमीन २०२१ मध्ये विकण्यात आली. चार वर्षांपूर्वी ही जमीन ५७ लाख २० हजार रूपयांना घेतली. त्यानंतर परबांनी हीच जमीन ६० लाखांना विकली. त्यादरम्यान अनिल परबांनी सांगितलं होतं की, या ठिकाणी १६ हजार ८०० चौरस फुटाचा रिसॉर्ट तयार झाला. परंतु त्याचं बाजारमुल्य २५ कोटी इतकं होतं, यालाच मनी लॉण्ड्रींग असं म्हणतात.

- Advertisement -

परब आणि कदमांवर कारवाई होणार

सब रजिस्टरची यावर सही असून त्याबाबत आम्ही तक्रार केली होती. परंतु त्याचाही तपास ठाकरे सरकारने थांबवला. त्यामुळे यासंबंधीत सर्व माहिती सर्वात आधी आम्ही पोलीस आयुक्त आणि हाय कोर्टात आम्ही दिल्या आहेत. परब आणि कदमवर कारवाई होणार, तसेच ही कारवाई महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांना करावी लागणार आहे. इन्कम टॅक्सपासून सर्व विभाग यासंबंधीत चौकशी करत आहेत.


हेही वाचा : सर्व गोष्टींचा खुलासा कोर्टात करीन, आजची चौकशी रिसॉर्टबाबत – अनिल परब


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -