घरताज्या घडामोडीपुणे-मुंबई रेल्वेमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

Subscribe

राज्यभरात गुरूवारी सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील खंडाळा आणि लोणावळ्या स्थानकादरम्यान दरड कोसळली आहे.

राज्यभरात गुरूवारी सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील खंडाळा आणि लोणावळ्या स्थानकादरम्यान दरड कोसळली आहे. त्यामळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. (land slide on pune mumbai railway track near lonavla khandala)

गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खंडाळा आणि लोणावळ्या स्थानकामधील असलेल्या मंकीहील ते ठाकूरवाडीदरम्यान दरड कोसळल्याची माहिती मिळते. दरड कोसळ्याची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. तसेच, दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले.

- Advertisement -

अप लाईनवर ही दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू होती. मात्र अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. सध्या रेल्वे उशिराने धावत आहे. शिवाय, लवकरच रेल्वे सेवा पूर्ववत होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्ट रोजी लोणावळ्या जवळील पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर दरड कोसळली. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. बोल्डर आणि ओएचईचा खांब पडल्याने मार्ग ठप्प झाला आहे. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. अथक परिश्रमानंतर दरड हटवण्यास यश आले आहे. अप लाईनवर ही दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद होती. तसेच, अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील मिठी नदीत दोन जण बुडाले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचा शोध सुरू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -