Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर शहरांच्या नामांतरावर मोठ्या प्रमाणात आक्षेप, छत्रपती संभाजीनगरच्या बाजूने 153 तर विरोधात 37...

शहरांच्या नामांतरावर मोठ्या प्रमाणात आक्षेप, छत्रपती संभाजीनगरच्या बाजूने 153 तर विरोधात 37 हजार प्रस्ताव

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या मंजूरीनंतर राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात केले होते. मात्र या निर्णयावर 27 मार्चपर्यंत आक्षेप मागवण्यात आले असून नामांतराला विरोध करण्यासाठी आक्षेप आणि हरकतींची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात छत्रपती संभाजीनगरचे नाव पुन्हा औरंगाबाद होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

औरंगाबाद जिलह्याचे संभाजीनगर नामांतर करण्याचा निर्णय सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव २९ जून २०२२ रोजी मंजूर केला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकराने उद्धव ठाकरेंचा निर्णय रद्द करून औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्याचा निर्णय घेतला होता. पुढे हा प्रस्ताव केंद्रकाकडे पाठवण्यात आला आहे. केंद्राने मंजूरी दिल्यानतंर १७ जुलै २०२२ रोजी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने अधिसूचना काढून औरंगाबाद जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गावाचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नामांतर ‘धाराशीव’ असे केले होते.

- Advertisement -

या दोन्ही जिल्ह्यांचे नामांतर झाले असले तरी या निर्णयावर 27 मार्चपर्यंत आक्षेप मागवण्यात आले आहेत. बऱ्याच लोकांना नामांतर मान्य नसल्यामुळे नामांतराला विरोध करण्यासाठी आक्षेप आणि हरकतींची संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव नामांतराच्या निर्णयावर 37 हजारांवर आक्षेप, हरकती मिळाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर नामांतरासाठी 26 हजार 336 आक्षेप, तर धाराशिवच्या नामांतरासाठी 11 हजार आक्षेप दाखल झाले आहेत. याशिवाय नामांतराला समर्थन देणारे 153 प्रस्ताव दाखल झाले आहेत. अजून सहा दिवस आक्षेप दाखल करून घेतले जाणार असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नामांतराला मोठ्या प्रमाणात आक्षेप
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव या नामांतराला आक्षेप दर्शविण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होत आहेत. नामांतराच्या समर्थनात आणि विरोधात अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढत असून यासाठी शहरातील चौका-चौकात कॅम्प देखील लावण्यात आले आहेत. तसेच वेगवेगळ्या बैठका घेऊन अर्ज दाखल करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -