घरमहाराष्ट्रनाशिकआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएस परीक्षेत चक्क ‘लातूर पेपर’ कॉपी पेस्ट

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएस परीक्षेत चक्क ‘लातूर पेपर’ कॉपी पेस्ट

Subscribe

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सावळा गोंधळ

नाशिक : बोर्डाच्या परीक्षांसाठी राज्यभर प्रसिध्द असलेला ‘लातूर पॅटर्न’ आता वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसच्या परीक्षांसाठी नावारुपास आला आहे. लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाने घेतलेल्या सराव परीक्षेतील बहुतांश प्रश्न आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्य परीक्षेत ‘कॉपी पेस्ट’ झाल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएसची परीक्षा घेतली जात आहे. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने नोव्हेंबर 2021 रोजी मायक्रोबायोलॉजी विषयाची शंभर गुणांची परीक्षा घेतली. या परीक्षेतील ‘सेक्शन बी’ अर्थात वर्णनात्मक प्रश्न विचारले आहेत. सराव प्रश्नपत्रिकेतील सात वर्णनात्मक प्रश्न मुख्य परीक्षेत जसेच्या तसे विचारण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. सराव परीक्षेत हेच प्रश्न सात ते 20 गुणांसाठी सोडवण्यास सांगितले होते. असाच प्रकार मुख्य परीक्षेतही बघायला मिळाल्याने या विद्यार्थ्यांना पेपर अगदी सोपा गेल्याची भावनाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

त्यामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रश्नपत्रिका तयार करताना या गोष्टींची चाचपणी केली नाही का? असाही प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. अशा पध्दतीचे प्रश्न कॉपी पेस्ट झाल्यास वैद्यकीय क्षेत्रातही ‘लातूर पॅटर्न’ विकसीत होईल, अशीही भिती या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करुन एमबीबीएससह वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकांसदर्भात शनिवारी पडताळणी करुन पुढील निर्णय घेणार आहोत. प्रसंगी यात काही तथ्य आढळ्यास या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल.
– डॉ.माधुरी कानिटकर, कुलगुरु, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -