घरताज्या घडामोडीमुंबईत होहो बस सेवेचा शुभारंभ

मुंबईत होहो बस सेवेचा शुभारंभ

Subscribe

पर्यावरणपुरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत 'जबाबदार पर्यटन' उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मुंबई : पर्यावरणपुरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हो हो बसची सुविधा सुरु केली असून, या दुमजली बसचे लोकार्पण पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. (Launch of Ho ho bus service in Mumbai)

पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी आज लोढा यांच्या हस्ते विविध पर्यटन उपक्रमांचे उद्घाटन मंत्रालयात करण्यात आले. त्यानंतर बोलताना लोढा म्हणाले,महामंडळाच्या चित्रफित,छायाचित्र आणि दिनदिर्शिकेचे विमोचन,अंजिठा लेणी आकाश निरीक्षण उपक्रम, एमटीडीसी आणि एचआर कॅालेजच्या सहकार्याने युवा पर्यटन संघ उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आहे. युवा पर्यटन संघ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबई हे देश विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. मुंबईत या पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हो हो बसची सुविधा सुरु केली आली आहे.आगामी कालावधीत ११ हो हो बस राज्यभरात सुरू करण्यात येणार आहेत.या बस बऱ्याच वर्षांपासून नादुरुस्त स्थितीत होत्या.त्यांना दुरुस्त करुन पर्यटकांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. या बसच्या आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. बुक माय शो या ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनीची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती लोढा यांनी दिली.

मुंबईत होहो बस प्रायोगिक‍ तत्वावर सुरू केली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमार्फत मुंबईतील महत्वाच्या पर्यटन स्थळी ही बस जाईल.या बसचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमार्फत पर्यटकांना ऑनलाईन बुकींग करता येईल, असे लोढा म्हणाले.

- Advertisement -

युवा पर्यटन संघाची स्थापना

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि एच. आर. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज युवा पर्यटन संघ स्थापन करण्यात आला आहे.या उपक्रमात पर्यटन विषयक शिक्षण घेणारे २० विद्यार्थी आज सहभागी झाले होते.पर्यटनातील विविध संधी आणि पर्यटन स्थळे यामुळे पर्यटन विषयक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना फायदा होईल, असा विश्वास मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आदी उपस्थित होते.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंचा ‘तो’ अल्टिमेटम शिंदे गटाकडून धाब्यावर, सिब्बलांनी मांडला तोच मुद्दा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -