घरमहाराष्ट्रLive Update : साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना अटक; ईडीची कारवाई

Live Update : साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना अटक; ईडीची कारवाई

Subscribe

अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे बंधू आहेत.


गोरगावच्या फिल्म सिटीत आग. गुम है किसी के प्यार मै, या मालिकेच्या सेटला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

- Advertisement -

बंदूक आमदार सदा सरवणकरांची, पण गोळीबार दुसऱ्यानेच केला होता, असा अहवाल पोलिसांनी दिला आहे. गेल्या वर्षी गणपती विसर्जनाला प्रभादेवी येथे वाद झाला होता. त्यावेळी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप झाला होता.


जादूटोण्यासाठी विकलं सुनेच्या मासिक पाळीचं रक्त

- Advertisement -

पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर

पतीसह एकूण सहा जणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना प्रकरणी ईडीची कारवाई


कांद्याच्या प्रश्न आणि महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमध्ये आंदोलन

नाशिक-मुंबई महामार्ग राष्ट्रवादी काँग्रेसने रोखला

समीर भुजबळ यांचा आंदोलनात सहभाग


मुंबई शेअर निर्देशांक 643.11 अंकांनी गडगडला

राष्ट्रीय शेअर निर्देशांक निफ्टीतही 172.15 अंकांची घसरण


रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम ईडीच्या ताब्यात

साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदम यांच्यावर कारवाई

सदानंद कदम यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईला रवाना


उद्धव ठाकरे मुंबई विमानतळावर दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला करणार अभिवादन

रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही उपस्थित


शिवरायांच्या विचारावर शिवसेना चालते – संजय राऊत

सरकार पडण्याच्या भीतीने हे बजेट सादर – संजय राऊत

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बजेटचं सादरीकरण


शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्रपती बनले

राष्ट्रपती म्हणून त्यांनी तिसऱ्यांदा कार्यकाळ स्वीकारत त्यांनी इतिहास घडवला


शिळ-दिव्यात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, आगीत एकाचा मृत्यू


दिल्ली माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. दिल्लीतील मद्यविक्री धोरण प्रकरणात सीबीआयने सिसोदिया यांना अटक केली होती. त्यांची आज सुटका होणार होती, परंतु जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वीच गुरुवारी त्यांना ईडीने अटक केली. तपासात सहकार्य न केल्याने मनीष सिसोदिया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. तर, गुरुवारी ईडीने सिसोदिया यांना तिहार तुरुंग क्रमांक 1 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली. याप्रकरणी ईडीने आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे.


जर्मनीच्या हेम्बर्ग शहरात गोळीबार, सात जणांचा मृत्यू

जर्मनीतील हेम्बर्ग शहरातील एका चर्चमध्ये गोळीबाराची झाला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हेम्बर्ग पोलिसांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, अल्स्टरडॉर्फ परिसरातील जेहोवाज विटनेस चर्चमध्ये गोळीबार झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. हॅम्बर्ग पोलिसांनी ट्विट केले की ते सध्या हल्ल्याच्या कारणाचा तपास करत आहेत.


नामांतराविरोधात आज छत्रपती संभाजीनगर बंदची हाक

लोकहित परिषद आणि इतर संघटनांकडून आंदोलनाला पाठिंबा


राहुल गांधींनाही हक्कभंगाची नोटीस

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अपशब्द वापरल्याप्रकरणी कारवाई

आज विशेषाधिकार समितीपुढे हजर राहावं लागणार


केंद्र सरकारविरोधात आज दिल्लीत विरोधकांचं आंदोलन

१८ पक्ष होणार सहभागी


शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवभक्तांचा अपघात

भरधाव वाहनांची धडक, १५-२० शिवभक्त जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

टेम्पोचालक हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात


सभागृहात आजपासून अर्थसंकल्पावर चर्चा होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -