Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Live Update : मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस, नाराज नाही - अजित पवार

Live Update : मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस, नाराज नाही – अजित पवार

Subscribe

मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस, नाराज नाही – अजित पवार

सुप्रिया सुळेंचा कमिटीत निर्णय़ घेण्यात आला.

- Advertisement -

मी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता ही जबाबदारी आहे. ती जबाबदारी मी योग्य पार पाडतो आहे.

मी अतिशय समाधानी आहे. माझ ४ वाजताचे विमान होतं त्यामुळे ताबडतोब निघालो

- Advertisement -

आम्ही कमीटीमध्ये दोन निर्णय घेतले होते. त्यात एक शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा तर दुसरा निर्णय सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करण्याबाबत होते.


लोकसभेच्या निवडणुकीसाठी १ वर्ष राहिले आहे. पुन्हा मोदींचे सरकार तुम्हाला हवंय का, महाराष्ट्रातून ४५ जागांवर विजयी करणार का?, पुन्हा नरेंद्र मोदी यांना विजयी करणार का ?

६५ वर्षांचा काँग्रेसचं काम आणि मोदींच्या नेतृत्वातील ९ वर्षांच्या कामात फरक आहे. विकासाकडे नेण्याचे काम मोदी यांनी केलं आहे.

तुम्ही औऱंगाबादचे नाव बदलण्याचे समर्थन नाही करु शकत, उस्मानाबादचे नाव बदलण्याचे समर्थन नाही करु शकत आणि आता अहमदनगरचे नामकरण करण्याचे समर्थन करु शकत नाही.

उद्धव जी तुम्ही माझ्या प्रश्नांचे उत्तर द्या

उद्धवजी म्हणतात अमित शाह यांनी सरकार तोडलं तर त्यांना मी सांगू इच्छितो तुमच्या चालींमुळे शिवसैनिकांनी सरकार पाडलं

मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले

उद्धव ठाकरे तुम्ही दोन दगडांवर पाय ठेवू शकत नाहीत.

मी उद्धव ठाकरे यांना विचारतो आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तुमची भूमिका स्पष्ट करा, तीहेरी तलाक हटवले त्याला तुम्ही सहमत आहात की नाही

कर्नाटकात ज्यांचे सरकार आले आहे ते वीर सावरकर यांचे इतिहासातून नाव काढत आहेत. याला तुम्ही सहमत आहात की नाही

राम मंदिर बनत आहे त्याला तुम्ही सहमत आहात की नाही?

भाजपची काही सरकारे समान कायदा आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तुम्ही त्याला सहमत आहात का ?

मी उद्धव ठाकरेंना विचारतोय मुस्लिम आरक्षण संविधान सहमत नाही. धर्माच्या आधारावर आरक्षण होत नाही. मुस्लिम आरक्षण झाले पाहिजे की नाही?

राज्यात भाजप- शिवसेनेचं सरकार आले आहे.
धनुष्यबाण चिन्हा शिंदेंना मिळालं आणि जनतेला कळालं कोणाची शिवसेना खरी आहे.

मोदींना देशात आणि जगात सन्मान मिळत आहे. तर दुसरीकडे राहुलबाबा परदेशात जाऊन अपमान करत आहेत.

राहुल गांधी परदेशात जाऊन बोलत आहेत कारण इथे त्यांना कोणी ऐकत नाही आहे.

मी भाजप अध्यक्ष असताना राहुल गांधी म्हणाले भाजपवाले फक्त मंदिर बनवणार सांगतात पण बनवत नाहीत तर मी नांदेड वाल्यांना सांगू इच्छितो राम मंदिर बनत आहे.

बाबरने पाडलेले मंदिर पुन्हा बनवण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमधून 370 कलम हटवले

राहुलबाबा म्हणाले मोदींच्या काळात रक्ताच्या नद्या वाहतील पण कोणाची हिंमत दगड मारण्याची नाही – अमित शाह

काँग्रेसनं चार पिढ्यांच्या सरकारमध्ये देशातील जनतेसाठी काय केलं – शाह

पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यावर सर्जिकल स्ट्राईक करुन पाकचं तोंड बंद केलं – शाह

काँग्रेसच्या काळात बाजूचे देशातील आतंकवादी घुसखोरी करत होते. जवानांचे शिर नेत होते

मोदी आल्यानंतर एअर स्ट्राईक करुन उत्तर दिलं

१० वर्षांच्या सोनिया – मनमोहन सिंग यांच्या सरकारनंतर परिवर्तन करण्यासाठी आलो आहोत

सगळ्यात भ्रष्ट सरकार काँग्रेसची होती

९ वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या काळात काम झाली पण विरोधक भ्रष्टाचाराचे आरोप करु शकले नाही. आम्ही पारदर्शक सरकार दिलं आहे.

महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानायला आलो आहे – शाह

राज्यात ४५ जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प – अमित शाह

महाराष्ट्र नंबर १ करण्यात फडणवीसांचे योगदान – अमित शाह

सरदार पटेलांनी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं


मुलगी ज्या घरात जन्माला येईल ते घर लखपती होणार – फडणवीस

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नमो शेतकरी योजना आणली

शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार

महिलांना एसटीमध्ये ५० टक्क्याची सूट दिली आहे.

त्यांनी घोषणा केली नांदेड- जालना रोड बनवणार पण फुटकी कवडी दिली नाही. आता आम्ही निधी दिला आणि हा रोड बनवत आहोत – फडणवीस

पंतप्रधान मोदींमुळे महाराष्ट्रात २५ लाख लोकांना आवास योजनेत घर मिळालं- फडणवीस

महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठी – फडणवीस

जल जीवन मिशन योजनेंतर्गत १ लाख कोटींपेक्षा जास्त घरात पाणी पोहोचवले – फडणवीस

महाराष्ट्रात १० लाख लोकं कुशल झाले

जरा यश मिळालं तर काँग्रेसच्या डोक्यात हवा जाते – फडणवीस

अशोक चव्हाणांची मजल 2G, 3G आणि सोनियाजींपर्यंतच – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हाच पॅटर्न – फडणवीस


 

10/6/2023 17:27:39 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेडमध्ये दाखल


10/6/2023 17:9:28 अजित पवार नाराज नाहीत, शरद पवारांचं स्पष्टीकरण

23 जूनला पाटण्यात विरोधी पक्षांची एकत्रित बैठक – शरद पवार


10/6/2023 15:5:44 अजित पवारांवर अन्याय झाला – चंद्रशेखर बावनकुळे

शरद पवारांना सुप्रिया सुळेंशिवाय काही चालत नाही – बावनकुळे


10/6/2023 13:4:7 पश्चिम रेल्वेची विरारकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

डहाणूकडून विरारकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे बंद


10/6/2023 12:19:52 प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती

शरद पवार यांनी नवी दिल्लीतील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळी केली घोषणा


10/6/2023 11:4:21 मुंबईत डोंगरी परिसरात 20 किलो एमडी जप्त

एनसीबीने मोठी कारवाई करत तिघांना केली अटक

जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 45 कोटींपेक्षा अधिक


10/6/2023 10:45:55 धुळ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

मुर्ती विटंबनाप्रकरणी जनआक्रोश मोर्चा

मोर्चासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त


10/6/2023 10:23:16 शरद पवार धमकी प्रकरणातील सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता – चंद्रशेखर बावनकुळे

सौरभ पिंपळकरने धमकी दिली नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती


10/6/2023 10:6:37 मुंबईतील डीबी मार्ग पोलिसांवर घरांचं संकट

ऐन पावसाळ्यात 116 पोलिसांना घरे खाली करण्याची नोटीस

इमारत धोकादायक असल्याचे देण्यात आले कारण


10/6/2023 8:40:58 मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला नेत्यांची हजेरी


10/6/2023 8:37:47 ईडीच्या निर्णायक प्राधिकरणाने शाओमी टेक्नॉलॉजी कंपनीला पाठवली कारणे दाखवा नोटीस

शाओमी कंपनीचे अधिकारी आणि तीन मोठ्या बँकांनाही ईडीकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती

शाओमी कंपनीवर ईडीने फेमा अंतर्गत कारवाई करत याआधी तब्बल 5 हजार 551 कोटी रुपयांची मालमत्ता केली आहे जप्त


10/6/2023 7:33:34 ब्रिटनचे खासदार बोरिस जॉनसन यांनी पदाचा दिला राजीनामा

ते ब्रिटनचे पंतप्रधान राहिले असून त्यांनी 2022 मध्ये पंतप्रधान पदाचा देखील राजीनामा दिला होता.


10/6/2023 7:25:28 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेड दौऱ्यावर

जाहीर सभा घेऊन कार्यकर्त्यांना करणार संबोधित


10/6/2023 7:25:28 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25 वा वर्धापन दिन

या निमित्ताने आज शरद पवार दिल्लीत राहणार हजर

दिल्लीच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारणीतले महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती

मुंबई आणि पुणे येथील कार्यालयात होणार पक्षाचे झेंडावंदन


10/6/2023 7:25:28 संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज देहूतून पंढरपूरसाठी प्रस्थान होणार

देहूमध्ये या निमित्ताने हजारो वारकरी आले एकत्र


10/6/2023 7:25:28 छत्रपती संभाजीनगरमधून मानाच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान होणार

- Advertisment -