घरCORONA UPDATELockDown: राज्यात लॉकडाऊन वाढला; पण नियमावलीच काय? वाचा वृत्त

LockDown: राज्यात लॉकडाऊन वाढला; पण नियमावलीच काय? वाचा वृत्त

Subscribe

देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना लॉकडाऊनचा विळखाही वाढत चालला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्यातही मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा ३० हजारांच्या वर गेला आहे. त्यामुळे राज्याची चिंता आणखीनच वाढली आहे. हा लॉकडाऊन नव्या ढंगात असेल, असे संकेत यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. त्यानुसार राज्यातही नवीन नियमावली बनवण्यात आली आहे. ही नियमावली उद्या, १८ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यानुसार लॉकडाऊनच्या या टप्प्यात काय सूट मिळेल किंवा कशावर निर्बंध असतील, हे नागरिकांना समजेल.

हेही वाचा – CoronaVirus: मुंबईत २८०१ नव्हे तर ६६१ कंटेनमेंट झोन; १११० इमारती सीलबंद

- Advertisement -

केंद्रातून नवीन गाईडलाईन येणार 

राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी लॉकडाऊन चारसंबंधीचा अध्यादेश जारी केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा आज, १७ मे हा शेवटचा दिवस आहे. मात्र नवी नियमावली जाहीर झालेली नाही. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनबाबतच्या केंद्रातील नियमावली न आल्याने राज्यातील नवी नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नसल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येणार लॉकडाऊन हा नवीन रुपात असेल, असे म्हटले होते. त्यानुसार ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील नियमांमध्ये थोड्या प्रमाणात शिथिलता येण्याची शक्यता आहे. मात्र रेड झोनला दिलासा मिळण्याची शक्यता धूसर आहे.

हेही वाचा – रोजगार निर्माण करण्यासाठी ‘मनरेगा’साठी ४० हजार कोटींची तरतूद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -