घरमहाराष्ट्रRamtek Voting : रामटेकमध्ये सरासरी ५१.७२ टक्के मतदान

Ramtek Voting : रामटेकमध्ये सरासरी ५१.७२ टक्के मतदान

Subscribe

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीतील मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात विदर्भातील ७ मतदार संघात आज, गुरुवारी मतदान पार पडत आहे. यामध्ये रामटेक मतदार संघाचाही समावेश होतो. रामटेकमध्येही सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी करायला सुरुवात केली आहे. हा अनुसूचित जातीसाठी राखीव असा मतदारसंघ आहे. या मतदार संघात एकूण १० लाख ४९ हजार २७८ मतदार असून यामध्ये ४ लाख ७३ हजार ००७ महिला तर ५ लाख ७६ हजार २७१ पुरुष मतदार आहेत. या मतदार संघात शिवसेनेचे कृपाल तुमाने तर काँग्रेसचे किशोर उत्तमराव गडभिये यांच्यात लढत असणार आहे. तर व्हीबीएचे किरण रोडगे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

9 - ramtek Lok Sabha Constituency
रामटेक लोकसभा मतदारसंघाचा नकाशा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -