घरमहाराष्ट्रAjit Pawar : द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय? मुलींच्या जन्मदराबाबत अजित...

Ajit Pawar : द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय? मुलींच्या जन्मदराबाबत अजित पवारांचं वादग्रस्त विधान

Subscribe

इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्यात गर्भपात आणि मुलींच्या जन्मदराबाबत विधान करताना अजित पवार भविष्यात सगळंच अवघड होणार आहे. येणाऱ्या काळात द्रौपदीचा विचार करावा लागेल, असा प्रसंग येऊ शकतो, असं वादग्रस्त विधान केलं आहे. 

इंदापूर : लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत पहित्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मात्र प्रचाराचा आज शेवटचा शेवटचा दिवस असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार बारातमी, दौंड आणि इंदापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्यात गर्भपात आणि मुलींच्या जन्मदराबाबत विधान करताना अजित पवार भविष्यात सगळंच अवघड होणार आहे. येणाऱ्या काळात द्रौपदीचा विचार करावा लागेल, असा प्रसंग येऊ शकतो, असं वादग्रस्त विधान केलं आहे. (Lok Sabha Election 2024 Ajit Pawars controversial statement about the birth rate of girls mentioning Draupadi)

डॉक्टरांनी सरकारी यंत्रणेमधील काही जाचक अटी कमी करण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केली होती. यासंदर्भात सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकारी यंत्रणेकडून निश्चित तुम्हाला त्रास होत असेल, काही ठिकाणी सोनोग्राफी सेंटरला  त्रास दिला जात असेल. परंतु बीडच्या घटना आणि पाठीमागील काळात 1000 मुले जन्माला आले की त्यावेळेस 800 ते 850 मुली जन्माला येत होत्या. पण हा दर 790 पर्यंत गेला. हे सर्व पाहता यापुढे द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय असा प्रश्न पडतो. परंतु हा गंमतीचा भाग झाला. मला कुणाचा अपमान करायचा नाही, परंतु डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांचा शासन दरबारी विचार केला जाईल, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Pawar Vs Pawar : वाढपी वाढतो म्हणजे त्याने एकट्यानेच स्वयंपाक बनवला असे नाही; राजेंद्र पवारांचा अजितदादांना टोला

अजित पवार म्हणाले की, मी विकास करणारा माणूस आहे. मी आजपर्यंत अनेक पंतप्रधान पाहिले. मी मोदींना विरोध करत होतो, पण त्यांच्यासारखा माणूस सारखा सारखा पाहायला मिळत नाही. त्यांनी अनेक कामे केली आहेत. एका बाजूला नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला कोणताही चेहरा नाही, पण राहुल गांधींचा चेहरा आपण धरला तर काय चित्र दिसतं तुम्हाल? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थितांना विचारला.

- Advertisement -

 सरकारमध्ये कामासाठी गेलो आहे, याचा अर्थ मी सत्तेसाठी हपापलेलो नाही. माझ्या एवढं कोणी पाच वेळा उपमुख्यमंत्री होईल असं वाटत नाही. त्यामुळे मी आताच्या खासदारासाठी मते मागायला आलो आहे. कारण याठिकाणी कोणताही केंद्राचा प्रोजेक्ट आला नाही. हर्षवर्धन पाटील आमच्या महायुतीचे घटक झाले आहेत. ते आपल्याला डॉक्टरांचे प्रश्न सोडवायला मदत करतील, असे म्हणत अजित पवार यांनी डॉक्टरांना हसत हसत सल्ला दिला.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मोदींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात

अजित पवार म्हणाले की, माणूस खरं कोणाशी बोलत असेल तर तो डॉक्टरशी बोलतो. त्यामुळे तुमच्याकडे जर तुमच्याकडे कोणी आलं तर त्यांच्याशी बोला, त्यांना विचारा काय चाललं आहे. जर त्यांनी आमचं नाव घेतलं तर त्यांच्याशी जरा चांगलं बोला आणि जर दुसऱ्याचं नाव घेतलं तर त्यांना जोरात इंजेक्शन द्या, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली. याचवेळी अजित पवार यांनी म्हटले की, आतापर्यंत तुम्ही आमच्या खासदाराला निवडून दिले आहे. त्यामुळे आता महायुतीच्या खासदाराला निवडून द्या. महायुतीचा खासदार आतापर्यंत निवडून दिलेल्या खासदारांपेक्षा उजवा असेल, असा विश्वास व्यक्त केला.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -