घरमुंबईRaj Thackeray : न केलेली विधानं तोंडात कोंबायची नसतात; अमित ठाकरेंच्या बातमीवर...

Raj Thackeray : न केलेली विधानं तोंडात कोंबायची नसतात; अमित ठाकरेंच्या बातमीवर राज ठाकरेंकडून संताप

Subscribe

राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर दिसतील. या बातमीविरोधात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून संताव व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई : राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर दिसतील. लवकरच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होईल, अशी माहिती राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना दिल्याची बातमी काही माध्यमांनी दिली होती. मात्र या बातमीविरोधात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून संताव व्यक्त करण्यात आला आहे. न केलेली विधानं तोंडात कोंबायची नसतात, असं त्यांनी म्हटलं आहे. (Raj Thackeray Anger over Amit Thackeray news)

राज ठाकरे यांनी ट्वीट करताना म्हटले की, काल एका वृत्तवाहिनीवर, अमितशी झालेल्या अनौपचारिक गप्पांचा दाखला देत, ‘राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार अशी बातमी चालवली होती. मुळात अमितने असं कोणतंही विधान केलेलं नाही. अमित काल पुण्याच्या दौऱ्यावर होता आणि तिथे त्याने पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळेस अमितने वरील विधान केल्याचा दावा एकाच वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी केला. इतर कुठल्याच पत्रकाराने ही बातमी का नाही केली? तिथे इतरही अनेक पत्रकार होते, पण कोणीच ही बातमी केली नाही, याचं कारण अमितने असं विधान केलंच नाही. अनौपचारिक गप्पा या अनौपचारिकच ठेवायच्या असतात आणि त्यात न केलेली विधानं तोंडात कोंबायची नसतात, हा संकेत असतो. त्यामुळे सर्व माध्यमांनी या बातमीकडे साफ दुर्लक्ष करावं अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : शरद पवारांनी शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सातत्याने केले! शिंदे गटाचा आरोप

- Advertisement -

महायुतीला राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा (Raj Thackerays unconditional support to Mahayuti)

दरम्यान, सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे, असे म्हटले होते. तसेच यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना तयारी करण्याचे आवाहनही केले होते. राज ठाकरेंच्या या निर्णयानंतर त्यांच्यावर विरोधकांना जोरदार टीका केली. मात्र त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : माढ्यात तिहेरी लढत; गणपतराव देशमुखांचे नातू अपक्ष लढणार

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -