घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींची वॉरंटी पण काँग्रेसची न्यायाची गॅरंटी...

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींची वॉरंटी पण काँग्रेसची न्यायाची गॅरंटी – विजय वडेट्टीवार

Subscribe

देशातील नागरिकांना खोटी स्वप्ने दाखवून भूलथापांच्या राजकारणातून भाजपने सत्ता काबीज केली. गेल्या दहा वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचे वाटोळे करीत व्यापाऱ्यांचे हित जोपासून भाजपाने संपूर्ण देशाला कर्जबाजारी केले आहे. देशातील शेतकरी देशोधडीला लागला असून महिला अत्याचार बेरोजगारी गुन्हेगारी यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. देशात धर्मांधतेच्या राजकारणातून अराजकता पसरविणे युवा पिढी व नागरिकांना दिशाहीन करणे हेच भाजपचे काम आहे. मोदींची वॉरंटी आहे पण काँग्रेसने मात्र न्यायची गॅरंटी दिली आहे.

मुंबई : देशातील नागरिकांना खोटी स्वप्ने दाखवून भूलथापांच्या राजकारणातून भाजपने सत्ता काबीज केली. गेल्या दहा वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचे वाटोळे करीत व्यापाऱ्यांचे हित जोपासून भाजपाने संपूर्ण देशाला कर्जबाजारी केले आहे. देशातील शेतकरी देशोधडीला लागला असून महिला अत्याचार बेरोजगारी गुन्हेगारी यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. देशात धर्मांधतेच्या राजकारणातून अराजकता पसरविणे युवा पिढी व नागरिकांना दिशाहीन करणे हेच भाजपचे काम आहे. मोदींची वॉरंटी आहे पण काँग्रेसने मात्र न्यायची गॅरंटी दिली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव काँग्रेस देणार, तरुणांना रोजगार देणार, आदिवासींना आपल्या जमिनीचा हक्क काँग्रेस मिळवून देईल, अशी भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली. (Lok Sabha Election 2024 PM Modi warranty but Congress guarantee of justice says Vijay Wadettiwar)

“देशाची लूट करणाऱ्या सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडी हाच एकमेव पर्याय असून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व घटक पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा”, असे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ मुलचेरा, अहेरी, एटापल्ली व सिरोंचा येथे प्रचार सभेचा धडाका लावला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : शक्तीला संपवण्याचे स्वप्न धुळीला मिळेल; फडणवीसांचा राहुल गांधीवर निशाणा

क्षेत्रातील आदिवासी समाज असो किंवा बंगाली समाज असो या प्रत्येक समाजाला समान वागणूक ही काँग्रेसने दिली. आदिवासी समाजाला वन हक्काचे पट्टे देण्याचे काम काँग्रेस काळातच झाले. या परिसराततील सुरजागडला तीनशे हेक्टर जमीन मिळाली तर चेन्ना प्रकल्पाला का नाही..? असे विविध प्रश्न यावेळी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

- Advertisement -

“या लोकसभा क्षेत्राचे भाजपचे गेल्या दहा वर्षापासून खासदार असलेले अशोक नेते ज्यांनी समस्या तर सोडा मतदारांना आजवर तोंड दाखवले नाही. पण आता मात्र जनतेला भेटणारा, त्यांचा समस्या सोडविणारा खासदार म्हणजे डॉ. किरसान तुमच्यासाठी काम करणार, म्हणूनच इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जिंकून द्या” असे आवाहनही विजय वडेट्टीवार यांनी केले.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : कमिशन आणा किंवा काम थांबवा हे काँग्रेसचे धोरण, चंद्रपुरातून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -